‘देशातल्या मोठ्या नेत्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटायची’

‘देशातल्या मोठ्या नेत्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटायची’

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील स्वर्ण जयंती समारंभात बोलताना काही मोठ्या नेत्यांवर आणि शरद पवारांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. सनातन धर्माविषयी ते या समारंभात बोलत होते. अनेक आक्रमणांनंतरही सनातन धर्म संपला नाही कारण हा धर्म सत्यावर आधारित आहे. त्यामुळेच आपली संस्कृती, आचरण हे अस्तित्वात आहे.

आपल्या गुरुजनांनी हा धर्म जोपासण्याचं आणि पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचं काम केलं. पण आता परिस्थिती वेगळी आहे. देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटायची. हे नेते मंदिरात जायचे पण लपून छपून. त्यांना असं वाटायचं की मंदिरात गेलो तर सेक्युलर मतं जातील. पण देशात एक प्रामाणिक पंतप्रधान निवडून आले. त्यांनी गरीबांचं कल्याण करण्याचा अजेंडा समोर ठेवला आणि त्याला आध्यात्मिकतेची जोड दिली.

हे ही वाचा:

शांघायमध्ये लॉकडाऊनमुळे होतेय लोकांची उपासमार

एसटी कर्मचारी आत्महत्या प्रकरणी सुओ मोटो खटला भरा!

देशभरातील १० हजार मंदिरांना मोहित कंबोज देणार लाऊडस्पीकर

कर्करोगग्रस्त रुग्णांचा कुटुंबीयांसाठी ‘बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह’

पंतप्रधान हे अगदीच सहजतेने मंदिरात जातात, आशीर्वाद घेतात. याआधीही जायचे आणि आता पंतप्रधान झाल्यावरही जातात त्याचा परिणाम असा झाला की, राहुल गांधी मंदिरात जाऊ लागले. अरविंद केजरीवाल हनुमान चालीसा पठण करू लागले. ममता बॅनर्जी या सुद्धा चंडिकादेवीची पूजा करू लागल्या. त्यामुळे स्वतःला सुडो सेक्युलर समजणारे, मंदिरात जाण्यासाठी घाबरणारे हे समजू लागले की धर्माचे पालन करणे ही लाजेची गोष्ट नाही तर अभिमानाची गोष्ट आहे, असे बोलून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून काही नेत्यांवर टीकास्त्र डागले.

Exit mobile version