शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. काही लोकांचा नखं कापून शहिद होण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
“संजय राऊत यांना पुराव्याच्या आधारे नोटीस मिळाली आहे, त्यांनी कायद्याने उत्तर द्यावे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमच्या अनेक नेत्यांच्या घरात माणसे घुसवत त्यांना नोटीसा देत आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी आज सकाळी आयएनएस विक्रांतसाठी निधी जमा करून तो निधी राज्यपाल कार्यालयात दिला नसल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. यावर किरीट सोमय्यांवर केलेले आरोप हास्यास्पद असल्याचे, देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते कोणत्याच आरोपाचा पुराव देऊ शकलेले नाहीत. राज्य सरकारकडून सोमय्या आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. पोलीस यंत्रणांवर दबाव टाकला होता. अखेर पोलिसंनी सांगितले की, चुकीची कारवाई करता येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. कितीही दबावाची कारवाई केली तरी सोमय्या बोलायचे बंद करणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
माननीय बाळासाहेब, जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या
‘देशात अनेक दशके व्होटबँकेचे राजकारण सुरू होते’
‘संजय राऊत, मुख्यमंत्री ठाकरेंना पुरावे द्या; टाईमपास करून वेळ घालवू नका’
भाजपा स्थापना दिन; देशभरातून निघणार शोभायात्रा
मनसे ही भाजपची सी टीम असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली होती. यावर माझा शिवसेनेला सवाल आहे की, शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीची कितवी टीम आहे. एक मुख्यमंत्रीपद घेऊन तुम्ही पक्षाची काय अवस्था केली आहे. आपल ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायच वाकून हे जरा बंद करा, असा खोचक टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचे आणि त्यांनाच लुटायचे हा धंदा मुंबईत कोण करत आहे हे स्पष्ट झाले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.