काँग्रेसची थीम ‘है तय्यार हम’ असली तरी लोक मात्र तयार नाहीत!

देवेंद्र फडणवीस यांनी उडविली खिल्ली

काँग्रेसची थीम ‘है तय्यार हम’ असली तरी लोक मात्र तयार नाहीत!

नागपूर येथे काँग्रेसने आपल्या स्थापना दिनाच्या निमित्ताने है तय्यार हम या धर्तीवर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. देशभरातून काँग्रेसचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. काँग्रेस नेते राहुल गांधीही या कार्यक्रमाला आले आणि त्यांनी भाषणही केले. पण त्यावर टीका करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसची थीम है तय्यार हम अशी आहे पण लोकच अद्याप तयार नाहीत, राहुल गांधी यांना गंभीरपणे घ्यायला.

फडणवीस यांना या कार्यक्रमाबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले की, या कार्यक्रमासाठी आलेले विदर्भ आणि नागपूरचे लोकही राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाहीत. किंबहुना तेलंगणातूनही लोक मागविण्यात आले होते. पण तरीही तिथे गर्दी जमवतां आली नाही. याचा अर्थ राहुल गांधी यांना गांभीर्याने लोक घेत नाहीत मग आम्ही का त्यावर गांभीर्याने उत्तरे द्यायची?

फडणवीसांनी सांगितले की, आता याला महारॅली म्हणता येत नाही. ती सूक्ष्म होती. अनेक लोक भाषणाआधीच निघून जात होते. खरे म्हणजे ते कशासाठी ते तयार आहे हे लक्षात आले नाही. मला आश्चर्य वाटले या देशात अनेक राजघराणी यांनी इंग्रजांशी संघर्ष केला, अनेकांनी आपले स्वत्व टिकवून ठेवले पण राहुल गांधी म्हणाले की, राजांनी इंग्रजांशी तडजोड केली. अशा पद्धतीने राजघराण्यातील व्यक्तींचा अपमान करणे हे योग्य नाही. हे देशात कुणी सहन करणार नाही.

हे ही वाचा:

कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ८ नौदल अधिकाऱ्यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती!

ऐकतेस ना ज्ञानदा? भाडखाऊंचे प्रलाप

पुण्यात दोन गॅंगनी एकमेकांविरोधात उगारले कोयते!

ठाकरे गटाला २३ जागा मग आम्हाला काय? काँग्रेसचा सवाल!

काँग्रेसच्या या महारॅलीसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती मात्र अपेक्षित असा प्रतिसाद लोकांकडून मिळाला नाही. राहुल गांधी यांचे यावेळी भाषण झाले. त्यात त्यांनी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या एका खासदाराची कथा सांगितली. संसदेत आपल्याला हा खासदार भेटला आणि त्याने नाराज असल्याचे सांगितले. आपण त्याला विचारणा केल्यावर भाजपात वरिष्ठांचे सातत्याने ऐकावे लागते असा सूर त्याने लावला. आपले शरीर जरी भाजपात असले तरी मन काँग्रेसमध्ये आहे असे तो म्हणाला. त्या खासदाराचे नाव मात्र राहुल गांधी यांनी उघड केले नाही.

दरम्यान, या रॅलीला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांनी हजेरी लावली नाही. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले. पण सोनिया गांधी यांच्या प्रकृतीमुळे त्या उपस्थित राहिल्या नाहीत, असे बोलले जात होते. राहुल गांधींनी मात्र उपस्थित राहात भाषण केले. मात्र त्यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर कोणतेही भाष्य केले नाही. याआधी, त्यांनी सावरकरांसंदर्भात केलेली वक्तव्ये त्यांच्या अंगलट आलेली आहेत.

Exit mobile version