26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणफडणवीसांनी १४ ट्विटस करत केली शरद पवारांची पोलखोल

फडणवीसांनी १४ ट्विटस करत केली शरद पवारांची पोलखोल

Google News Follow

Related

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १४ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या मुस्लिम लांगुलचालनावर प्रहार केला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फडणवीस यांनी ही १४ ट्विटस करत शरद पवार यांची पोलखोल केली आहे.

त्यात ते म्हणतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना एका गोष्टीकडे लक्ष वेधता येईल ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यास आणि कलम ३७०ला विरोध दर्शविला होता. पण शरद पवार तर या कलमाच्या बाजूने होते. कलम ३७० हटविण्यास पवारांनी विरोध दर्शविला होता आणि जम्मू काश्मीरच्या जनतेला विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला हवा होता, असे मत त्यांनी व्यक्त केले होते, याची आठवण फडणवीस यांनी करून दिली.

लांगुलचालन करणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण राहिले आहे त्यामुळे काश्मीर फाइल्सला त्यांनी विरोध करणे हे आश्चर्यजनक वाटले नाही, असे दुसरे ट्विट फडणवीस यांनी केले.

पुढील ट्विटमध्ये फडणवीस म्हणतात की, जेव्हा राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली तेव्हा मलिक हे मुस्लिम असल्यामुळेच त्यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला जातो, असे पवार म्हणाले होते. फडणवीस यांनी यासंदर्भातील पवारांचे विधान दाखविणाऱ्या बातम्याही सोबत जोडल्या आहेत.

२०१३मध्ये पवारांनी इशरत जहाँ ही निष्पाप असल्याचे विधान केले होते, याचाही उल्लेख फडणवीसांनी पुढील ट्विटमध्ये केला आहे. गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येसाठी कारस्थान रचणाऱ्या इशरत जहाँ आणि तिच्या काही साथीदारांना एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले होते.

फडणवीस पुढील ट्विटमध्ये म्हणाले की, इशरत जहाँ ही निष्पाप आहे असे तर ते म्हणालेच पण राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तिच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी धावून गेले. सत्तेत असतानाही त्यांनी त्यावेळी भारताच्या गुप्तचर यंत्रणेवरही अविश्वास व्यक्त केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत असताना आझाद मैदान दंगलीची घटना घडली. रझा अकादमीने आयोजित केलेल्या मोर्चातील लोकांनी अमर जवान ज्योतीची तोडफोड केली. त्यावेळी या हिंसक आंदोलनकर्त्यांबाबत राष्ट्रवादीने नरमाई दाखविली. एवढेच नाही तर मुंबईच्या पोलिस आयुक्तांचीच बदली केली.

हे ही वाचा:

एनसीबी मुंबई विभागाच्या संचालक पदी अमित घावटे

पहिलं तिकीट खरेदी करून पंतप्रधान मोदींनी केले प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन

दिवाळखोरी आणि परकीय चलन

‘सिल्वर ओक’ हल्ल्याप्रकरणीच्या तपासातून संभाषण पोलिसांच्या हाती

 

मुस्लिम मागासवर्गीयांसाठी ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय, कुणाला पराभूत करायचे हे अल्पसंख्य ठरवतात असे म्हणत त्यांचे केलेले लांगुलचालन, हिंदू दहशतवाद या शब्दाचा सर्वात प्रथम शरद पवार यांनी केलेला वापर, सच्चर समितीच्या शिफारशींची आधी अंमलबजावणी करा अशी पवारांची मागणी, १२ मार्च १९९३ला मुंबई १२ बॉम्बस्फोटांनी हादरली तेव्हा पवारांनी मुस्लिमबहुल भागात १३वा बॉम्बस्फोट झाल्याचे जाहीर केले आणि मुस्लिमांनी नाराज होऊ नये म्हणून प्रयत्न केला.

सामाजिक सौहार्द आवश्यक असताना अशी दुटप्पी भूमिका पवारांनी का घेतली असा सवाल फडणवीस एका ट्विटमध्ये विचारतात. काश्मीर फाईल्ससारखा चित्रपट वास्तव दाखवत असताना कुणाच्या भावना का दुखावतात? बनावट सेक्युलर अजेंडाला ते मानवणारे नाही म्हणून?

काश्मीर फाइल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माविरुद्ध नाही. लोक जेव्हा त्रास सहन करत होते तेव्हा आपला राजकीय अजेंडा राबविण्याचा जे प्रयत्न करत होते, त्यांच्यादृष्टीने हा त्यांच्या विरोधातील चित्रपट होता. समाजात दुही माजविण्याची ही कृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही स्वीकारली नसती, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा