असत्याच्या आधारावर त्यांनी एक निवडणूक जिंकली, दुसरी नाही!

महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांनी केले वक्तव्य

असत्याच्या आधारावर त्यांनी एक निवडणूक जिंकली, दुसरी नाही!

सत्य चिरकाल टिकतं. असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येईल. पण दुसरी नाही. विरोधकांना खोटं बोलायची चटक लागली आहे. विरोधक घरी तरी खरं बोलत असतील की नाही माहीत नाही, असा टोला लगावतानाच आपण सकारात्मकतेने योजना जनतेपुढे घेऊन गेलो तर आपला पराभव शक्य नाही. आपण योजनांची माहिती देतो अन् ते सकाळी येऊन काही तरी वेडंवाकडं बोलतील, माध्यमं तेच दाखवतील, आपल्याला सातत्याने चांगलं जनतेसमोर मांडलं पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईत महायुतीच्या मेळाव्याला संबोधित करताना फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सदर आवाहन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नरेटिव्हचा हा मुद्दा उचलून धरत म्हटले की, विरोधी पक्षांकडून खोटे नरेटिव्ह सेट केले जात आहेत त्यामुळे आपल्या तिन्ही पक्षांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या नरेटिव्हना चोख प्रत्युत्तर द्यावे लागेल. त्यासाठी आपण सज्ज राहायला हवे, असे अजित पवार यांनी सांगितले.

लोकसभेत तांत्रिकदृष्ट्या आपला पराभव झाला असला तरी आपण आता मैदानात आलो आहोत. ते खोटं बोलत होते. मात्र आपणही गाफील राहिलो, अशी कबुली देतानाच फेक नरेटिव्ह या चौथ्या विरोधकाशी आपल्याला लढावं लागलं, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी सावध राहण्याचा इशारा दिला.

लाडकी बहीण योजनेला विरोधक नावे ठेवत आहेत पण हे नाव ठेवणारे विरोधकच फॉर्म घेऊन घराघरात फिरत आहेत. अशा बेगडी भावांपासून सावध राहा. लाडकी बहीण योजनेत आता कुठल्याही अटी शर्ती नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

राज्यात नव्याने १० हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी करणार

२३ जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार

एक गठ्ठा मुस्लीम मतांचा भारतापाठोपाठ ब्रिटनमध्येही पराभव

१४७ गुंतवणूकदारांना गंडा घालून एका वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

 

वाचाळवीर प्रवक्त्यांना सुनावले

 सर्वपक्षीयांना सांगतो की, आपल्यात एकमेकांमध्ये विसंवाद आहे. प्रवक्ते काय बोलतायत ते बघा. खुमखुमी असेल तर नेत्यांना विचारा आणि खुमखुमी पूर्ण करा, अशा शब्दात महायुतीच्या वाचाळवीर प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानावरून आगामी विधानसभा निवडणुकीबाबत वेगवेगळे दावे सगळे पक्ष करत आहेत. महाविकास आघाडीने १५४ जागा निवडून येतील असा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या २०० जागा निवडून येऊ शकतात, असा दावा केला आहे.

ते म्हणाले की, राजकारणात कधी कधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो. लोकसभेत मविआ म्हणते आमचा विजय झाला. मविआ २ लाख अतिरिक्त मतांमुळे ३० जागांवर जिंकली. आपण निर्धार केला आणि किमान २० लाख मते जास्त घेतली तर आपल्या २०० जागा येतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

 

Exit mobile version