एकीकडे विरोधकांचा योजनेसाठीच्या पैशांवर सवाल; दुसरीकडे योजनेची रक्कम वाढवण्याचं आश्वासन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा

एकीकडे विरोधकांचा योजनेसाठीच्या पैशांवर सवाल; दुसरीकडे योजनेची रक्कम वाढवण्याचं आश्वासन

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महायुती सरकारचे अडीच वर्षांचे रिपोर्ट कार्ड प्रकाशित करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विरोधी पक्ष एकीकडे टीका करतो की लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून आणणार? मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी पैसे कुठून आणणार? सरकारकडे पैसे नाहीत, असंही म्हणतात आणि दुसरीकडे त्यांचे नेते म्हणतात की आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २००० रुपये करू. राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू. त्यामुळे आता विरोधकांनी आधी हे ठरवावं की योजनांसाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत की नाही. त्यानंतर त्यांनी टीका करावी. आम्ही ज्या योजना आतार्यंत सांगितल्या आहेत, त्या पूर्ण विचार करून जाहीर केल्या आहेत. त्या योजना यापुढेही चालू राहतील. प्रत्येक योजनेच्या पाठिशी पूर्ण आर्थिक पाठबळ उभं करूनच आम्ही योजना जाहीर करू. मात्र विरोधक गोंधळले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद करावी असं त्यांना वाटतं. परंतु, मला एक गोष्ट सर्वांना सांगायची आहे की या निमित्ताने महाविकास आघाडीचा पर्दाफाश झाला आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली आहे.

तसेच त्यांनी शरद पवारांना आव्हान दिले आहे की, शरद पवारांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा. महायुतीचा जागावाटापचा फॉर्म्युला देखील लवकरच जाहीर करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. जागावाटपाचे काम अगदी अंतिम टप्यात असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा :

विधानसभा निवडणुकीनंतर मनसे सत्तेत असेल

प्रभू श्रीराम लल्लांच्या दर्शनासाठी इस्रायली राजदूत अयोध्येत!

लोखंडवाला परिसरात इमारतीला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू

बेबी पावडरमुळे कर्करोग झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला जॉन्सन अँड जॉन्सनकडून मिळणार नुकसान भरपाई

महायुती सरकारने वेगवेगळ्या घटकांना दिलासा दिला आहे. कोतवाल, अंगणवाडी सेविका, आशाताई वर्कर प्रत्येक घटकाला दिलासा दिला. होमगार्डचं मानधन दुप्पट केलं. त्यांच्याही जीवनात परिवर्तन केलं. आगरी, कोळी, गवळी समाज, शिंपी, सोनार, लोहार, आर्यवैश्य, तेली समाज प्रत्येकाचे महामंडळ तयार केलं आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख तरुणांना उद्योगपती केलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Exit mobile version