‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’

‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी नाना पटोले यांना अडवून तुम्हाला येथे आंदोलन करता येणार नाही. आझाद मैदानात जा, असे पोलिसांनी नाना पटोले यांना सांगितले. त्यामुळे हे आंदोलन थांबवत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले.

काँग्रेसने आंदोलन मागे घेतल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. तुम्ही सर्व इथे असताना त्यांची आंदोलन वगरे करण्याची हिंमत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा सवालच नाही असे म्हटले आहे. तसेच हे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी देखील नाना पटोलेंवर आरोप केले आहेत. पोलीस झुंडशाही करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी कितीही नौटंकी केली तरी काही फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच नाना पटोले हे पुरेसे कार्यकर्ते जमा करू शकले नाही आणि घाबरून हे आंदोलन मागे घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसने देशाची माफी मागावी असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले

काँग्रेसचे आंदोलन; भाजपा कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

२०२२ मधील इस्रोची पहिली मोहीम फत्ते

एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी नाना पटोले हे त्यांच्या निवासस्थानातून निघाले होते. त्यांच्यासोबत वारकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते टाळमृदुंग वाजवत होते. नाना पटोले हे पायीच सागर निवासस्थानाकडे निघाले होते. तितक्यात पोलिसांनी त्यांना अडवले आणि सागर निवासस्थानाकडे जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर सामान्य नागरिकांना वाहतुकीच्या समस्या होतील म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे नाना पटोले म्हणाले.

Exit mobile version