महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. यामध्ये भाजपने चार जागांवर बाजी मारली असून नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या या विजयावर विधान सभा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.
Both these victories are special & results of hard work of every karyakarta.
With these victories from Nagpur & Akola by great margins, once again, @BJP4Maharashtra proves its mettle in these #MLCElections.
Out of total 6 seats, BJP won 4 seats of Maharashtra Vidhan Parishad !— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 14, 2021
आज मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. मी स्वत: निवडून आलो तेव्हा झालेल्या आनंदापेक्षा मोठा आनंद झाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. बावनकुळे यांचा विजय म्हणजे महाविकास आघाडीला ही चपराक आहे. अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनी निर्णायक विजय मिळवला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
अकोल्यात शिवसेनेला धक्का; वसंत खंडेलवाल विजयी
नागपूरच्या जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांची बाजी
श्रीनगरमध्ये पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार; दोन पोलीस शहीद
श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान
महाविकास आघाडी एकत्र आल्यावर त्यांचा विजय होऊ शकतो, हे मांडलेले गणित चुकीचे आहे, हे या निकालामुळे स्पष्ट झाले आहे. बावनकुळे यांचा विजय ही भविष्यातील यशाची नांदी आहे. नरेंद्र मोदी, जे पी नड्डा, नितीन गडकरी यांचे आभार मानतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा निर्णायक विजय असून भविष्यातील विजयाच्या मालिकेची सुरुवात आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
निवडणूक आयोगाने सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या तर नागपूर आणि अकोला वाशिम मतदारसंघामध्ये निवडणूक लागली. अकोला वाशिम बुलडाणा भाजपचे वसंत खंडेलवाल हे विजयी झाले. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत.