30 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरराजकारण‘मविआ सरकार राज्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार’

‘मविआ सरकार राज्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार’

Google News Follow

Related

राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू होण्याआधीच राज्याच्या राजकारणात आता हालचालींना वेग आला आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद याचे समर्थन करणाऱ्या सरकारच्या चहापान कार्यक्रमाला भाजप जाणार नाही, असा निर्णय देत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

आम्हाला चर्चा करण्यात अधिक रस आहे. अनेक वर्षांनंतर १७ ते १८ दिवस चालणारे अधिवेशन आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही या अधिवेशनात जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावाच अशी आग्रही मागणी त्यांनी केली असून नवाब मालिकांना वाचवण्यासाठी संपूर्ण महाविकास आघाडी सरकार उभे आहे आणि हे अत्यंत दुर्दैव आहे, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईकरांच्या खुन्यांशी व्यवहार करणे कधीही मान्य करणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ईडीच्या कोठडीत असणारे नवाब मलिक अजूनही मंत्रीपदावर कसे? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. वीज कनेक्शन तोडले जात आहे. शेतकऱ्याला आपल्या पिकला जळताना पाहावं लागत आहे, या सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत नाही, असा टोला देखील त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे. ठाकरे सरकार हे सावकारी सरकार आहे आणि याचा जाब विचारावाच लागणार आहे. ऊर्जामंत्र्यांचे उत्तर ऐकून आपण लोकशाहीत आहोत की तानाशाहित आहोत हे समजत नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अहंकारी भूमिका सरकारने घेतलेली आहे. पण ती भूमिका आम्ही नक्कीच मोडून काढू असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. छत्रपतींच्या घराण्यातल्या व्यक्तीला उपोषणाला बसावे लागले यातच सरकारच मोठं अपयश आहे, अशी घाणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे सरकारने पुन्हा तिच आश्वासन दिली आहेत जे आधी दिले होते, अशी टीका त्यांनी केली आहे.

हे ही वाचा:

विराटचा शंभरावा कसोटी सामना प्रेक्षकांच्या साक्षीने

संजय राऊतांना पुरावे समोर आणायला मुहूर्त मिळेना

आयएनएस विशाखापट्टणम पीएफआरमध्ये प्रथमच सहभागी

युक्रेनमध्ये व्होडाफोनसह अनेक टेलिकॉम कंपन्या देणार फ्री कॉलींग

आमच्या सरकारच्या काळात ‘महा ज्योती योजना’ सुरू केली होती. ती अक्षरशः या सरकारने बंद पाडली आहे. परीक्षांचे घोटाळे अजून सुरूच आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार म्हणून आता या सरकारबद्दल लिहायची वेळ आली आहे, असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. ठाकरे सरकारला सर्वात जवळचा घटक म्हणजे दारू, वाईन विक्री करणारे. लॉकडाऊन पासून या घटकासाठी जेवढे निर्णय घेतले आहेत, तेवढे कोणासाठीही यांनी घेतलेले नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा