विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारकडून सुडाच राजकारण होत असल्याचे ते म्हणाले.
रविवारी तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे देशात तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण आले होते. याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यात काहीही गैर नाही. मात्र, देशाच्या विविध राज्यांमध्ये यांचा हा प्रयोग करून झाला आहे, या प्रयोगाला यश मिळत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
हे ही वाचा:
बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची कर्नाटकमध्ये हत्या
लालूप्रसाद यादवांच्या शिक्षेवर आज सुनावणी
मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाचा प्रश्न ‘केंद्र’स्थानी
न्यायालयाच्या बाहेर वाहनांमध्ये बसून नोटरी व्यवसाय नको!
काल केसीआर यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्ही सुडाचे राजकारण कारत नाही असे सांगितले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, सुडाच राजकारण कोण करत आहे ते राज्यातील जनता बघत आहे. सुडाच राजकारण यांना करायचे आहे करू देत. न्याय द्यायला न्यायालय आहे, असे फडणवीस म्हणाले. नारायण राणे यांच्या घरासाठी नोटीस आली, नितेश राणे यांच्यावर कारवाई झाली, नवनीत राणा यांच प्रकरणही जनता पाहत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि हे जनता पाहत आहे, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. महाविकास आघाडी सरकारची निराशा आता बाहेर येत आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.