25.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरराजकारण‘महाविकास आघाडी सरकारने आणणेला विद्यापीठ कायदा हा काळा आहे’

‘महाविकास आघाडी सरकारने आणणेला विद्यापीठ कायदा हा काळा आहे’

Google News Follow

Related

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी आज बुधवारी मुंबईत भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्यातील वाढती गुन्हेगारी गुन्हे, नवीन विद्यापीठ कायदा, ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार आदी अनेक मुद्द्यांवरून त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

ठाकरे सरकारच्या काळात बलात्कार वाढले, राज्यातील गुन्हेगारीचे रेकॉर्ड वाढले, असे फडणवीस म्हणाले. नव्या विद्यापीठ कायद्यामुळे विद्यापीठं ही राजकीय अड्डे बनणार आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकीकडे मोदी भ्रष्टाचार मुक्त कारभार करत आहेत, तर दुसरीकडे भ्रष्टाचार युक्त कारभार सुरू आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

या कायद्यामुळे विद्यापीठाचे सर्व निर्णय हे सरकार घेणार. सध्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात आहेत म्हणजे इथे परत घोटाळे करणाऱ्या कंपन्या येणार, असे फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने आणणेला विद्यापीठ कायदा हा काळा आहे. त्यावर एक व्यक्ती विद्यापीठाचा, एक राज्यपालाचा आणि तीन व्यक्ती सरकारचे असतील. या कायद्यामुळे राज्यपालही कटपुतळा बनतील असा दावा त्यांनी केला आहे.

फडणवीस म्हणाले, जेवढ्या नेमणुका सरकारने आपल्या हाती घेतल्या आता तिथे युवासेनेची मुले तिथे बसतील. विद्यापीठे युवासेनेचे अड्डे बनवण्याचे षडयंत्र सुरू आहे. हे पिढ्या बरबाद करण्याचे षडयंत्र आहे. आपण आज लढलो नाही, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. ज्या वेळी आमची विद्यापीठे विकली जात होती, राजकारणाची अड्डे बनत होती, तेव्हा तुम्ही काय करत होतात, असा प्रश्न येणाऱ्या पिढ्या विचारतील, असे फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

अमिताभ, राज ठाकरे यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव…

‘बुल्ली बाई’ ऍप प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना कोरोना

राज्यात लॉकडाऊनचा विचार नाही; मात्र निर्बंध कठोर करणार

महाविकास आघाडी सरकार जेव्हा- जेव्हा काळी कामे करते, तेव्हा- तेव्हा ते कोविडच्या मागे लपतात. याचा अर्थ कोविड नाही असा नाही. मात्र, सरकारचे मोर्चे आणि त्यांची स्वागतकामे यांच्यासाठी कोविड नसतो. जेव्हा- जेव्हा काळी कामे केली जातात. त्याविरोधात आवाज उठवला की, त्यांना कोविड आठवतो, असा घाणाघात फडणवीस यांनी केला. राज्य सरकारने विद्यापीठ कायद्याचे विधेयक अवैध पद्धतीने मंजूर केले. काळ्या रात्री, काळे काम करणारे हे विधेयक पास केले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा