देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देशभरातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज २६ जानेवारी रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वप्रथम नागरिकांना ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सरकारचे डोके फिरले आहे, अशा कठोर शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी मैदानाला दिलेल्या टिपू सुलतानच्या नावावर आक्षेप घेतला. राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले असतानाच मुंबई महानगर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला विरोधी पक्षातील नेत्यांनी चांगलेच घेरले आहे. टिपू सुलतान असे मैदानाला नाव दिल्यामुळे आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार यांनीही शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा मंत्रालयातील फाईल तपासतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. यावरून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. अण्णा हजारे यांच्या अथक प्रयत्नांमधून सामान्य नागरिकाला माहितीचा अधिकार मिळाला आहे. त्यानुसार कार्यालयात जाऊन कामाची पाहणी करता येते. याच अधिकाराखाली किरीट सोमय्या गेले होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. खुर्ची वापरण्यावरून आणि कार्यालयात गेल्याच्या कारणाने जी नोटीस देण्यात आली ती कोणत्या अधिकाराने देण्यात आली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचरला. कार्यालय काय कोणाच्या बापाचं नाही, सरकारी कार्यालय आहे, अशा कठोर शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. तसेच आपण बाप हा कठोर शब्द वापरत आहोत कारण हे लोक खासगी कार्यालय असल्यासारखे नोटीस पाठवत आहेत, असे स्पष्टीकरणही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
हे ही वाचा:
सीडीएस बिपिन रावत, प्रभा अत्रे, सोनू निगम पद्म पुरस्काराने गौरवित
राज्यातील महाविद्यालये या तारखेपासून होणार सुरू
प्रजासत्ताक दिनाच्या गुगलकडून भारतीयांना खास शुभेच्छा
आनंद महिंद्र यांनी पाळले वचन; दिली नवी कोरी बोलेरो!
मंत्रालयात सीसीटीव्ही आहेत. त्यावरून फोटो काढला तेच तक्रारदार आहेत हे समोर आले आहेत. यांची मिलीभगत असून यांचे गैरप्रकार कोणी उघड करायचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीची बदनामी करायची. हे खपवून घेतले जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.