महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर विधी मंडळात तोफ डागली आहे. ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचताना फडणवीसांनी त्यांच्यावर काव्यात्मक टीकाही केली आहे. ज्येष्ठ मराठी साहित्यिक विंदा करंदीकर आणि हिंदी साहित्यिक पी. एल. बामनिया या दोघांच्या कवितांचा आधार घेत फडणवीसांनी सरकार विरोधात जोरदार फटकेबाजी केली आहे.
कविवर्य गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांची ‘सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते’ ही कवीता फडणवीसांनी विधिमंडळात सादर केली. ठाकरे सरकारच्या कारभाराचे वर्णन करण्यासाठी त्यांनी या कवितेचा आधार घेतला.
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते
माकडछाप दंतमंजन, तोच चहा, तेच रंजन
तीच गाडी, तेच तराणे, तेच मूर्ख, तेच शहाणे
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते
खानावळीही बदलून पाहिल्या,
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं
काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी, तेच ते आंबट सार
सुख थोडे आणि दुःख फार
हे ही वाचा:
महेंद्रसिंग धोनीने सोडले चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधार पद
‘परीक्षेचा हिजाब वादाशी संबंध नाही’, तातडीने सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
परमबीर प्रकरणातील तपास सीबीआयकडे! ठाकरे सरकारला आणखीन एक दणका
ठाकरे सरकारच्या मतांना न्यायालय दाखवते केराची टोपली
तर त्यानंतर त्यांनी हिंदी कवी पी. एल. बामनिया यांच्या हिंदी कवितेचा आधार घेत सरकारवर तोफ डागली आहे. ‘तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो’ असे म्हणत आत्मस्तुतीत मग्न असलेल्या ठाकरे सरकारवर फडणवीसांनी शालजोडीतून हल्ला चढवला आहे.
तुम चाहों तबेलों को बाजार कह दो
पतझडों का बहार कह दो
तुम्हाराही राज है अब यहाँ पर
तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो
छुट्टी का दिन बितने लगा यहीं पर
अपने दफ्तर को तुम घरबार कह दों
इसी पर मिलने लगी हर खबर,
अपने मोबाइल को अखबार कहदो
तुम्हारी इस सहुलियत भरी जिंदगी में
मुसिबत खडी करदे, उसे सरकार कह दों
फर्जी डिग्रीया बहोत लेली लोगों ने
तुम चाहो तो पढे लिखों को गवार कह दो