28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारण'मी आलो, पण यांना घेऊन आलो!' फडणवीस यांनी लगावला टोला

‘मी आलो, पण यांना घेऊन आलो!’ फडणवीस यांनी लगावला टोला

Google News Follow

Related

मी पुन्हा येईन म्हणून माझी टिंगल टवाळी करण्यात आली, पण मी आलो. मात्र यांना सोबत घेऊन आलो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील भाषणात विरोधकांना टोला हाणला. फडणवीस यांना अडीच वर्षे सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली. पण त्यावेळी फडणवीसांची वेळोवेळी खिल्ली उडविली गेली. त्याचा संदर्भ घेत त्यांनी मविआच्या नेत्यांना टोला लगावला. एकनाथ शिंदे यांना आता आपण सोबत घेऊन आलो आहोत, असे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मविआचं सरकार आलं त्यावेळी मी सांगितलं की हे अनैसर्गिक आहे. तेव्हा टिंगल टवाळी झाली, मी पुन्हा येईन ही कविता म्हटली होती. त्याच्यावर टिंगल केली. पण मी आलो. यांनाही घेऊन आलो. एकटा नाही आलो. यांना सोबत आणले. अध्यक्ष महोदय ज्यानी माझी टिंगल केली, अपमान केला त्याचा मी बदला घेणार. माझा बदला एवढाच मी त्यांना माफ केलं. राजकारणात अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हर एक का मौका आता है.

फडणवीस यांनी एक शेर ऐकविला.

दुनिया के सारे शौक पाले नही जाते

काच के खिलौने हवा मे उछाले नही जाते.

कोशिशे करनेसे जित होती  है आसान

क्यु की हर काम तकदीर के भरोसे टाले नही जाते

 

जरी या ठिकाणी आम्हाला जनतेचा कौल मिळाला असताना विरोधी पक्षात बसावे लागले तरी त्यातून विचलित झालो नाही. जनतेचे प्रश्न मांडले. कोरोनाचा काळ असलो तरी जनतेत राहिलो. म्हणूनच काही लोकांना वाटायंचं सत्तेसाठी करत आहोत. सत्ता हे आमचं साध्य नाही साधन आहे. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी सत्ता हवी आहे. म्हणूनच सरकार जाईल तेव्हा पर्यायी सरकार देऊ, असेही फडणवीस यांनी सांगितले.

हे ही वाचा:

लहानातल्या लहान माणसाच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे!

संतोष बांगर एकनाथ शिंदेंसोबत विधानसभेत रवाना

शिंदे फडणवीस सरकारने बहुमत चाचणी १६४ मतांनी जिंकली

हिमाचलमध्ये बस दरीत कोसळून १६ प्रवाशांचा मृत्यू

ला दाखवून दिले की, सत्ता महत्त्वाची नाही. खंत होती ती ही की जनतेने कौल दिल्यावर ती संधी हिरावून घेतली. पण पंतप्रधान मोदी म्हणाले की, हो आम्ही सरकार बनवू. बाळासाहेबांच्या सच्च्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवून जनतेने जो कौल दिला होता, त्याचा सन्मान आम्ही राखू. माझ्या नेत्यांनी मला आदेश दिला की, या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हा. ज्या पक्षाने मला सर्वोच्च स्थान दिलं त्यांनी मला घरी बसायला सांगितलं असतं तरी बसलो असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी मी ताकदीने उभा आहे. त्यांची कारकीर्द यशस्वी होईल, ती अधिक यशस्वी कशी होईल यासाठी मी प्रयत्न करीन. कुठल्याही प्रकारे त्यांच्यात माझ्यात दुरावा दिसणार नाही. सत्तेसाठी साठमारी दिसणार नाही. कुरघोडी दिसणार नाही. आमच्यातील मैत्री कायम राहील.

उपमा देत नाही. धनानंदाची सत्ता निरंकुश होते, तेव्हा चाणक्याला चंद्रगुप्त शोधवा लागतो. निरंकुश सत्ता खाली आणावी लागते. हेच याठइकाणी होताना दिसत आहे. सरकार बनल्यावर मोकळ्या मनाने स्वीकारली पाहिजे. आनंद आहे की, शरद पवारांनी माझा गौरव केला. त्यांचेही आभार मानतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा