भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. किरीट सोमय्या हे कोविड जम्बो सेंटरमधील भ्रष्टाचार संदर्भात निवेदन देण्यासाठी पुणे महापालिकेत आले असताना त्यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. या घटनेवरून भाजप नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
‘राज्यात कायदा- सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे?’ असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. ‘आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!’ असे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही?
आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे?
आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही!
महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका.
किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध! @KiritSomaiya https://t.co/dJH4xC2Wno— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 5, 2022
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सरकार तुमचे आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची आहे. जर सोमय्या आरोप करत असतील तर ते खोटे आहेत हे सिद्ध करुन दाखवा, घोषणाबाजी आणि अंगावर धावून काय येता? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
हे ही वाचा:
‘संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला’
पवित्र मंत्रोच्चारात पंतप्रधानांच्या हस्ते ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चे उद्घाटन
किरीट सोमय्यांना पुणे महापालिका परिसरात शिवसैनिकांची धक्काबुक्की
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची बांधणी
किरीट सोमय्या हे पुणे पालिकेत पोहचताच शिवसैनिक घोषणाबाजी करत सोमय्या यांच्याकडे आले. त्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी आणि धक्काबुक्की करायला सुरुवात केली. त्यामुळे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सोमय्या यांना गाडीत बसू देण्यासही शिवसैनिकांनी विरोध केला. त्यांच्या सुरक्षारक्षकांना ही धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. त्यानंतर पुणे महापालिकेच्या परिसरात शिवसैनिकांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे ट्वीट सोमय्या यांनी केले आहे.