27 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारण'सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत'

‘सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत’

Google News Follow

Related

राज्यातील विविध परीक्षा घोटाळे समोर येत असून आता या प्रकरणी विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. परीक्षा घोटाळा प्रकरण आता तपासासाठी सीबीआयकडे देण्यात यावे अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे.

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडे पहिल्या धाडीमध्ये ८८ लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी २ कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच तीन महिन्यात बाहेर काढल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. प्रीतीश देशमुखकडे पोलीस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. त्यावरून आता पोलीस भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलीस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसत आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. या सर्व परीक्षा घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, समोर येतील. अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानी बोटीतून जप्त केले ४०० कोटींचे हेरॉइन

माफी मागितली! आता पुन्हा बडबड सुरू…

मल्हार महोत्सव जपणार महाराष्ट्राची संस्कृती

‘घटिया आजम खान रोड’ झाला ‘अशोक सिंघल मार्ग’

म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात डॉ. प्रीतीश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत २०२०च्या टीईटी परीक्षेच्या सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. या धाग्यांवरून टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी करून तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. सुपे यांच्या घरातून पहिले ८८ लाख आणि आज २ कोटी जप्त करण्यात आले. त्यानंतर डॉ. देशमुख यांच्या घरातून पोलीस भरतीतील काही विद्यार्थ्यांची ओळखपत्रे सापडल्याने पोलीस भरती परीक्षेमध्येही घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा