राज्यात सध्या अनेक परीक्षांचे घोटाळे सुरू आहेत. या घोटाळ्यांचे पडसाद विधानसभेत हिवाळी अधिवेशनात उमटले. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या परीक्षा घोटाळ्यांवरून सरकारवर टीकास्त्र सोडले. या सरकारच्या काळात एकही परिक्षा घोटाळ्याशिवाय झालेली नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. न्यासा कंपनीला अपात्र करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांना पात्र करण्यात आले यावर सभागृहात गुरुवारी चर्चेची मागणी फडणवीस यांनी केली. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही चर्चेची मागणी केली असून या घोटाळ्याची तार कुठपर्यंत जात आहे हे समजले पाहिजे असे म्हटले.
आरोग्य भरती परीक्षेत मोठा गोंधळ झाला. न्यासा या कंपनीला अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी या कंपनीला कंत्राट देण्यात आले. इतर कंपन्यांनाही या परीक्षा घेण्याचे कंत्राट देता आले असते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनी काळ्या यादीत होती. या कंपनीला तीन महिन्यात पुन्हा या काळ्या यादीतून बाहेर काढून कंत्राट दिले, असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हे ही वाचा:
सुकेश चंद्रशेखर विरुद्ध नोरा फतेही देणार साक्ष?
‘ठाकरे सरकारचा धिक्कार असो’…विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून विरोधकांचे आंदोलन
विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजपासून श्रीगणेशा
जर्मन नवरदेव आणि रशियन वधू हिंदू पद्धतीने लग्नबंधनात
संपूर्ण शासकीय यंत्रणा सडलेली आहे, अशी घाणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. प्रशांत बडगीरे यांच्या वाहन चालकाकडे प्रश्नपत्रिकेचा संच सापडला. या घोटाळ्यांवर चर्चा झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.