देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मैदानात उतरले आहेत. यावेळी फडणवीस यांनी एका प्रचारसभेत बोलताना महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीकास्त्रे सोडली आहेत. सरकारमधील सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविषयी भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा केवळ छपाईचा उद्योग सुरू आहे आणि माल खाण्याचा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका केली आहे.
भाजप सरकारच्या काळात १० लाख कुटुंबांना घरे देण्यात आली. मात्र, आता सरकार बंद पडले आहे. आता फक्त छपाईचा कार्यक्रम, माल खाण्याचा कार्यक्रम, भ्रष्टाचाराचा कार्यक्रम सुरू आहे. मिळेल तिथे खाऊ आणि सोबत राहू, अशा पद्धतीचा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा यांनी तोडल्या आहेत. जनतेचे हजारो कोटी रुपये खाल्ले आहेत. हिशोब ठेऊन भ्रष्टाचार केला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
LIVE | Addressing public meeting at Kundalwadi in Nanded district for Deglur by-election.
नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे देगलूर पोट-निवडणुकीसाठी प्रचारसभा@BJP4Maharashtra #BJP #Nanded #Deglur https://t.co/kMoUhOXTd8— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 25, 2021
अतिवृष्टीत प्रचंड नुकसान झाले; पण या सरकारने एका नव्या रुपयाची मदत केली नाही. बोलायला बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. पीक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे इतके लबाड आहेत की काहीही झालं की, केंद्रावर ढकलतात. बायकोने मारले तरी केंद्राने मारले, असं सांगतील, अशी खोचक टीकाही फडणवीसांनी केली आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिक माझ्या मृत आईवर हल्ले करत आहेत
‘सुशांतसिंह प्रकरणात नितेश राणे लवकरच करणार हा गौप्यस्फोट
‘सात अजुबे इस दुनिया के, आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हे’
मला चुकीच्या पद्धतीने अडकवले जात आहे, वानखेडे यांनी लिहिले पत्र
एका मंत्र्याचा जावई गांजा विकताना आढळून आला. पण मंत्री म्हणतो की ही हर्बल तंबाखू आहे. मग आमचे सदाभाऊ खोत म्हणाले की, आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या. म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी खोचक टीका फडणवीस यांनी नवाब मलिकांवर केली आहे.
आमच्या काळात पाच वर्षात एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापले गेले नाही. मात्र, या सरकारमध्ये सर्रास वीज कापली जात आहे. नांदेडमध्येही हे फक्त पोटनिवडणुकीसाठी थांबले आहेत. एकदा पोटनिवडणूक होऊ द्या, मग इथेही वीज कापायला येतील, असेही फडणवीस म्हणाले.