काँग्रेस नॅनो, ऑटोनंतर आता सायकल पार्टी होईल!

काँग्रेस नॅनो, ऑटोनंतर आता सायकल पार्टी होईल!

गोव्यातील काँग्रेसची अवस्था लवकरच सायकल पार्टीसारखी होईल, अशा शब्दांत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि गोव्यातील निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील काँग्रेसच्या झालेल्या अवस्थेवर प्रहार केला. पोंडा येथील कार्यक्रमात भाषण करताना फडणवीस म्हणाले की, भाजपामध्ये प्रवेश करत असलेले आमदार, मुख्यमंत्री, बहुजन नायक रवी नाईक यांच्या या प्रवेशामुळे एक मोठा बदल घडला आहे. बाबु कवळेकर भाजपात आले त्यावेळी काँग्रेस नॅनो पार्टी झाली. चार लोक उरले. आज रवी नाईक भाजपात आले आता नॅनो पार्टी नाही तर ती ऑटो पार्टी झाली आहे. आपण काळजी करू नका. प्रतापसिंह राणेंचा आशीर्वाद प्राप्त झाला की सायकल पार्टी होणार. एक चालवेल आणि डबलसिट घेतली की झाली काँग्रेस पार्टी.

फडणवीस म्हणाले की, ही फक्त गोव्यातील स्थिती नाही. देशातील ही काँग्रेसची अवस्था आहे. याचे कारण हे की, दोन-दोन तीन-तीन वर्षे काँग्रेसचा अध्यक्षच ठरविला जात नाही. विरोधी पक्षनेता निवडून यावा एवढेही लोक निवडून येत नाहीत. सोनियाजी म्हणतात राहुल गांधींना अध्यक्ष करा तर राहुल गांधी म्हणतात मला व्हायचे नाही. २६ लोक एकत्र आलेत ते म्हणतात आमच्यातील अध्यक्ष करा तर राहुल गांधी त्याला विरोध करतात. प्रियांका म्हणतात माझ्याकडे लक्ष द्या. तर राहुल म्हणतात मला करा.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; पोस्टरवरून फोटो गायब

शिवसेनेचे यूपीएच्या दिशेने पहिले पाऊल

विंटर ऑलिम्पिकवर अमेरिकेचा बहिष्कार

…त्या बाळाचे पालक आता मुंबईच्या महापौर!

 

काँग्रेसला अध्यक्षच नाही. समाजात काम करणारे लोक आहेत, गरीबांसाठी काम करणारे नेते आहेत त्यांना लक्षात आलं की काँग्रेसला भविष्य नाही. हा पक्ष आता देशाचं भलं करू शकत नाही. देशाचं भलं करायचं तर एकच नेता नरेंद्र मोदीजी. त्यांच्या नेतृतावाखाली भाजपाच देशाचं भलं करू शकते, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Exit mobile version