32 C
Mumbai
Friday, November 1, 2024
घरराजकारणइथे औरंगजेब नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजच हिरो !

इथे औरंगजेब नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजच हिरो !

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

औरंगजेब हा येथे कोणाचाही हिरो होऊ शकत नाही. येथील मुस्लिम समाजाचाही तो हिरो नाही. इथे हिरो असलेच तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजच असू शकतात. महाराणा प्रताप असू शकतात. एपीजे अब्दुल कलाम हे हिरो असू शकतात. त्यामुळे या राज्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊ देणार नाही. असे उदात्तीकरण करणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

 

आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. औरंगजेबाचे उदात्तीकरण करून काही लोक नियोजनपूर्वक अशा घटना घडवत असल्याची माहिती गृहविभागाला मिळाली आहे, त्यावर एटीएस आणि आयबी यांच्याकडून काम सुरु आहे, आवश्यक वाटल्यास एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

पुणे दहशतवादी प्रकरणात पाचव्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

वज्रमुठ सुटली, रिमोट बंद पडला,विरोधी आघाडीचा बाजार उठला…

विहिरीचं काम सुरू असताना अपघात; चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

संजय राऊत यांनाच आता पवारांसाठी शंभर जन्म घ्यावे लागतील बहुतेक !

गृहमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात अलीकडे मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेटस ठवून औरंगजेब हा हमारा बाप असा आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. अशांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहील. मात्र हे महाराष्ट्रात अत्यंत नियोजनपूर्वक घडवले जात आहे, अशी आमच्याकडे माहिती आहे. सभागृहात ती देता येत नसली तरी त्याचा पाठपुरावा सुरु आहे. तपास युद्ध पातळीवर सुरु आहे.

 

 

ही लक्षवेधी आ. राणे मांडत असताना सपाचे आमदार अबू आझमी आणि आ. रइस शेख यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावर भाजप आणि शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर, आ. राम सातपुते, आ. महेश लांडगे यांनी आ. आझमी यांच्या भूमिकेला विरोध केला. यावर गृहमंत्री फडणवीस म्हणाले, राष्ट्र प्रथम मानले पाहिजे. मतांच्या राजकारणासाठी अशी भूमिका ठेवणे योग्य नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा