30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारणनामांतराची प्रक्रिया सोमवारपर्यंत पूर्ण होईल

नामांतराची प्रक्रिया सोमवारपर्यंत पूर्ण होईल

दानवेंच्या आरोपाला फडणवीसांचे उत्तर

Google News Follow

Related

औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्याच्या नामांतराला केंद्र सरकारकडून शुक्रवारी रात्री उशिरा मान्यता देण्यात आली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नामांतर औरंगाबाद शहराचे आहे की, संपूर्ण जिल्ह्याचे? असा उपरोधिक सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. दानवे यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. महाराष्ट्र सरकारने संपूर्ण औरंगाबाद जिल्हा, शहर, तालुक्याच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राला पाठवला होता. त्याला केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार काल नोटीफीकेशन काढले असल्याचे स्पष्ट केले आहे.

हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा.. ता. ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का हे पण सांगा @Dev_Fadnavis जी! अशी खोचक विचारणा आंबादास दानवे यांनी केली होती. दानवे यांनी केलेले ट्विट रिट्विट करून फडणवीस यांनी दानवे यांना जोरदार उत्तर दिले आहे.

फडणवीस यांनी ट्विट करताना अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही!

हे ही वाचा:

मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल

आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा

‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात

कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर

शहरासोबतच पालिका, नगरपालिका, तालुका, जिल्ह्याचेही नामांतर करण्यात येईल. जिल्ह्याच्या नामांतराबाबत महसूल विभागाकडून शासन निर्णय जारी केला जाईल. तर, महापालिका, नगरपालिकेच्या नामांतरासंदर्भात नगरविकास विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात येईल. आज व उद्या सुट्टी असल्यामुळे या विभागांनी आतापर्यंत शासन निर्णय जारी केला नसेल. मात्र, सोमवारी याबाबतची प्रक्रिया शक्यतो पूर्ण होईल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. फडणवीस म्हणाले की औरंगाबाद व उस्मानाबादचे शहर, तालुका, जिल्हा, महापालिका, नगरपालिका या सर्वांचेच नाव बदलले आहे. कुणीही संदिग्धता बाळगू नये.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा