छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक असे विधान विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी विधिमंडळात केले होते. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. पवार यांच्या वक्तव्यावर सगळीकडून टीका होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केलं राष्ट्रधर्म स्वधर्म आणि हिंदू धर्म तिन्हीच रक्षण त्यांनी केलं धर्मांतरण करा हे त्यांनी कधीच मान्य केलं नाही. अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी देखील छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते असे सणसणीत उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार याना दिले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केलं राष्ट्रधर्म स्वधर्म आणि हिंदू धर्म तिन्हीच रक्षण त्यांनी केलं धर्मांतरण करा हे त्यांनी कधीच मान्य केलं नाही. स्वदेश स्वभूमी आणि स्वधर्म याकरता हालअपेष्टा सहन करुन त्यांच बलिदान झालेल आहे. त्यांच्या शरिराचे तुकडे झाले पण तरीदेखील त्यांनी स्वधर्म आणि स्वराष्ट्र आणि स्वराज्याची भाषा सोडली नाही म्हणून अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी देखील छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?
ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश
स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?
गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करताना म्हणाले , एका बाजूला सांगायचे थोर पुरुषांचा आदर करा. दुसरीकडे संभाजीराजांना धर्मवीर म्हणून नका म्हणणे हे निषेधार्ह आहे . महाराष्ट्रात याचा मोठ्या उद्रेक होईल. कालही, आजही आणि पुढची हजारो वर्षे छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच राहतील. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर, धर्मरक्षकच म्हटलं पाहिजे. त्यांनी हिंदू धर्मासाठी ४० दिवस अन्यन्य हाल सोसले असेही गोगावले म्हणाले