‘जलयुक्त शिवार योजनेचा अहवाल म्हणजे सरकारनेच सरकारच्या टीकेला दिलेले उत्तर आहे’

‘जलयुक्त शिवार योजनेचा अहवाल म्हणजे सरकारनेच सरकारच्या टीकेला दिलेले उत्तर आहे’

देवेंद्र फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने काही आक्षेप घेतले होते. त्यानंतर चौकशीसाठी महाविकास आघाडी सरकारने एक समिती स्थापन केली होती. आता या समितीने जलयुक्त शिवार योजनेप्रकरणी तत्कालीन फडणवीस सरकारला क्लीन चीट दिली आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

समितीच्या निर्णयानंतर आनंद असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ‘ही जनतेची योजना आहे. जनतेने राबवलेली योजना आहे. मी न्यायालयात एक रिपोर्ट दिला होता. त्यानुसारच हा अहवाल आला असावा. ६०० वेगवेळ्या तक्रारी होत्या. त्याबाबत चौकशी होईल, असे मी स्वतः म्हटले होते. चुकीच्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे. त्याला माझी काहीच हरकत नाही. पण, ६ लाख कामांसाठी ६०० कामांची चौकशी करण्यात आली. ती झाली नसती तर बरं झालं असतं. पण, ६०० तक्रारींसाठी पूर्ण योजनेला बदनाम करणे, हे बरोबर नाही’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

क्रूझ ड्रग्स प्रकरणातला आणखी एक पंच फुटला!

‘दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे’

फडणवीस खरे ठरले! जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट

हिमवर्षावात बालमित्रांनी गमावले प्राण!

दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेवर फडणवीसांवर अनेकदा टीका करण्यात आली होती. त्यावरही फडणवीसांनी उत्तर दिले असून ‘हा अहवाल म्हणजे सरकारनेच सरकारच्या टीकेला दिलेले उत्तर आहे’, असेही फडणवीस म्हणाले.

कॅगच्या अहवालातील ताशेऱ्यांमुळे या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातच ठाकरे सरकारने जलयुक्त कामांच्या खुल्या चौकशीसाठी चार सदस्यीय SIT स्थापन केली होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला होता. त्यात ९०० कामांची लाचलुचपत विभागाच्या माध्यमातून व १०० कामांच्या विभागीय चौकशीची शिफारस केली होती. मात्र आता खुद्द सरकारच्या जलसंधारण विभागानेच या आक्षेपांवर उत्तर दिले आहे.

Exit mobile version