नितीन गडकरी यांना तुरुंगातून आला होता धमकीचा फोन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये प्रतिपादन

नितीन गडकरी यांना तुरुंगातून आला होता धमकीचा फोन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना खंडणीसाठी धमकीचा फोन आला होता , तो आम्ही अतिशय गांभीर्याने घेतला असून तत्काळ तो कॉल ट्रेस करून त्यावर गुन्हा दाखल केला आहे. कॉल करणारा आरोपी बेळगावच्या जेल मधून कॉल करत होता, तिथे त्याने मोबाईल मिळवून हे फोन केले आहेत. त्यामागे त्याचा हेतू काय होता आणि त्याच्या पाठीमागे आणखी कोण कोण आहे का? याची पडताळणी पोलीस विभाग करणार आहे.

जेलमध्ये त्याच्याकडे फोन कसा केला याचा तपास कर्नाटक सरकार करत आहे, ते कारवाई करतील, अस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते नागूपरमध्ये एका कार्यक्रमानंतर बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन बेळगाव तुरुंगातून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेळगावच्या तुरुंगात कैदेत असलेल्या जयेश कांथा नावाच्या सराईत गुन्हेगाराने हा फोन कॉल केल्याची माहिती मिळाली आहे. जयेश कांथा याने काही वर्षांपूर्वी केरळ मध्ये जाऊन धर्म परिवर्तन केले असल्याची माहितीहि मिळाली आहे. जयेश कांथा याने तुरुंगाच्या आत नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून कॉल केल्याचं समोर आल आहे.

 

यापूर्वी २०१६ मध्ये तो जेल तोडून पळून गेला होता शिवाय त्याने जेलमधूनच अशाच पद्धतीने अनेक वेळा पूर्वी ही धमकीचे कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. गडकरी यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या धमकी मागे एकटा जयेश आणि त्याची टोळी आहे , की अंडरवर्ल्डचे काही मोठे गॅंगस्टर यामागे आहेत याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.नागपूर पोलिसांची एक टीम त्वरित बेळगावला रवाना झाली आहे.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्या प्रकरणी तपास करण्यासाठी बेळगावातील हिंडलगा जेलमध्ये नागपूर पोलीस शनिवारी रात्री दाखल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. नितीन गडकरी यांना शनिवारी सकाळी धमकीचा फोन आला होता.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचे कळते. पोलीस खात्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून नागपूर पोलीस बेळगावात दाखल झाले आहेत. कोल्हापूर ,सांगली आणि बेळगाव पोलीस त्यांना तपासात मदत करत आहेत. शनिवारी रात्री दोन तासाहून अधिक काळ जेलमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली असून रविवारी पुन्हा जेलमध्ये शोध मोहीम राबवून तपास करण्यात येणार आहे.

Exit mobile version