महाराष्ट्रात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था पुर्णपणे ढासळलेली दिसत आहे. मुख्यमंत्री केवळ पुढची लाट येणार इतकेच सांगताना दिसत आहेत, त्यासाठी आवश्यक त्या तयारीचा मात्र पुर्ण अभाव आढळून आला आहे.
दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेले दिसून आले आहेत. आजच त्यांनी नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी एकूण प्रशासनाकडून किंवा सामाजिक क्षेत्रातून काय मदत लागणार आहे, याबाबत माहिती घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी या बाबत ट्वीट केले आहे.
हे ही वाचा:
राज्यात पुरती बेबंदशाही माजलेली आहे
मुख्यमंत्री कोरोनाची लाट थोपवण्याची उपाययोजना करण्याचे सोडून वसूलीत गर्क
शिवकथाकार डाॅ.सुमंत टेकाडे यांचे निधन
अमेरिकेतील गोळीबारात चार शिखांचा मृत्यू
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नागपूर येथे मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. एकूणच स्थितीचा आढावा घेत, प्रशासनाकडून वा सामाजिक क्षेत्रातून काय मदत लागणार यासंदर्भात त्यांनी माहिती घेतली.
आमदार प्रवीण दटके, मेयोचे अधिष्ठाता डॉ. केवडीया, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. पी पी जोशी, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. लांजेवार इत्यादी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार प्रवीण दटके, मेयोचे अधिष्ठाता डॉ. केवडीया, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. पी पी जोशी, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. लांजेवार इत्यादी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) April 17, 2021
देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी देखील राज्यातील जनतेला मदत केली आहे. त्यांनी दमणमधून महाराष्ट्र राज्यासाठी मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर उपलब्ध होईल यासाठी आमदार प्रविण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना जातीन दमणला जाण्यास सांगितले होते. त्याबरोबरच त्यांनी नागपूरमध्ये कोविड केंद्र देखील चालू केले होते.