पंढरपूरमध्ये पांडुरंगाने आशीर्वाद दिला, कोल्हापूरमध्ये आई अंबाबाई देईल

पंढरपूरमध्ये पांडुरंगाने आशीर्वाद दिला, कोल्हापूरमध्ये आई अंबाबाई देईल

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस सध्या कोल्हापूरमध्ये आहेत. त्यावेळी प्रचाराच्या रणधुमाळीतून वेळ काढत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंढरपूरमध्ये आम्हाला पांडुरंगाने आशीर्वाद दिला तर कोल्हापूरमध्ये आता आई अंबाबाई आम्हाला आशीर्वाद देईल असे फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधारी ठाकरे सरकारवर फडणविसांनी हल्ला चढवला आहे.

कोल्हापुरात उत्तर हा मतदारसंघ पारंपारिकरित्या हिंदुत्ववादी मतदारसंघ राहीला आहे असे फडणवीस म्हणाले. भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. वर्षानुवर्षे इथे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत होती. त्यांना भाजपाची मदत होत होती. त्यामुळे आमच्या विचारांना मानणारा तिकडचा मतदार आहे. काँग्रेसचे उमेदवार लढत आहेत. शिवसेना त्यांना पाठिंबा देत आहे. पण म्हणून शिवसेनेला मत दिलेले मतदारही काँग्रेसला मत देईल असे होणार नाही.

हे ही वाचा:

पोलिसांना चुकविण्यासाठी गो तस्करांनी गाईंनाच गाडीतून फेकले

‘श्रीरामांच्या आचार-विचारांचा जीवनात सर्वांनी अंगीकार करायला हवा’

पृथ्वीराजच्या रूपात कोल्हापूरला मिळाली २१ वर्षांनी महाराष्ट्र केसरीची गदा

मनसेने थेट शिवसेना भवनाबाहेर लावली हनुमान चालीसा
हा महाराष्ट्र आहे की बंगाल?
उत्तर कोल्हापूर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण आहे. सत्ता पक्षाचे नेते, मंत्री दहशत पसरवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे हा महाराष्ट्र आहे की पश्चिम बंगाल झाला आहे? असा प्रश्न उपस्थित व्हावा अशाप्रकारे दहशत पसरवण्याचे काम सुरू आहे. पण या दहशतीला झुगारून लोक मतदान करतील आणि भाजपालाच लोकांचे मतदान मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

भाविकासाठी आघाडी सरकार बद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रचंड चीड, संताप आहे. सरकारच्या भ्रष्टाचारी कारभारावर जनता खुश नाही. कोल्हापूरला महापुर आल्यानंतर जनतेला आश्वासन दिलं गेलं की २०१९ च्या तत्कालीन सरकारने जे काही दिलं त्याच्यापेक्षा जास्त मदत आम्ही देऊ. पण वास्तवात तसे काही झालं नाही. गोकुळच्या निवडणुकीसाठी कोल्हापूरमधील लॉक डाऊन पुढे ढकलण्यात आला आणि त्यामुळे चारशे जणांचा मृत्यू झाला असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला आहे. तर गोकुळची निवडणूक झाल्यावर लॉकडाऊन लावण्यात आला. तेव्हा या लॉकडाऊनचा विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना मारण्यात आले.

महाराष्ट्राचे हे सरकार स्वतःच्या पलीकडे पाहू शकत नाही ही भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला चांगला विजय होईल आणि भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम हे भाजपाचे १०७ वे आमदार म्हणून निवडून येतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. पंढरपूरला आम्हाला पांडुरंगाने आशीर्वाद दिला, यावेळी आई अंबाबाई आशीर्वाद देईल असे फडणवीसांनी म्हटले आहे.

Exit mobile version