उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने जे मत व्यक्त केले आहे, ते खूप महत्त्वाचे आहे, स्टेटस को अन्टे करता येणार नाही. उद्धवना मुख्यमंत्री करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले ते महत्त्वाचे होते, हे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन या निकालाबाबत आपली भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या संदर्भात हा जो निकाल दिला या निकालाबद्दल पूर्ण समाधानी आहोत. निश्चितपणे लोकमताचा विजय झालेला आहे. हा जो काही निकाल आहे, त्यातल्या चार पाच मुद्द्यांकडे लक्ष वेधतो.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर
गद्दारांच्या मागणीचा मी का विचार करू म्हणून दिला राजीनामा!
जयंत पाटलांना ईडीची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊत थरथरत बोलले, सरकारने राजीनामा द्यावा!
एक म्हणजे महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर पाणी फेरत सर्वोच्च न्यायलायाने सांगितले की, आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेबाबत सगळा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. त्यामुळे तेच आता आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी घेतील.न्यायालयाने या सगळ्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. अध्यक्षांचे अधिकार त्यांनाच दिले आहेत. आमदारांनी आता सभागृहात सहभागी होता येईल. सभागृहाच्या कामकाजाशी या निकालाचा संबंध नाही. ज्या आमदारांना सगळे अधिकार आहेत असे न्यायालयाने सांगितले आहे, असेही फडणवीस म्हणाले. त्यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाला पूर्णपणे अधिकार आहे हेदेखील न्यायालयाने सांगितले आहे. सगळे अधिकार निवडणूक आयोगाचे आहेत. त्यात कुठलीही बाधा नाही, असे सांगितले आहे.
फडणवीस यांनी सांगितले की, राज्यपालांनी शिंदे यांना सरकार बनविण्यासाठी बोलावले. काही लोकांना शंका होती. सर्वोच्च न्यायालयाने शंकेचं समाधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाला मानत असतील तर. त्यांच्या शंकेचं समाधान झलं असेल.
उद्धवजी नैतिकतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न करू नका!
फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद बघितली. त्यात ते म्हणाले की, मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. सवाल आहे भाजपासोबत निवडून आलात काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलात तेव्हा कुठे होती नैतिकता? खरे म्हणजे नैतिकतेचा विषय त्यांनी सांगू नये. खुर्चीकरिता विचार सोडला. एकनाथ शिंदेंनी विचारांकरिता खुर्ची सोडली ते सत्तेत होते. विरोधी पक्षासोबत म्हणजे आमच्यासोबत आले. उद्धव यांच्या लक्षात आले नंबर आपल्यासोबत नाहीत. हरणार आहेत लोक सोडून गेलेत, त्या लाजेपोटी भीतीपोटी त्यांनी राजीनामा दिला. विनाकारण त्याला नैतिकतेला मुलामा देण्याचा प्रयत्न करू नका.