पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेला अल्पसंख्यांक मेळावा वादग्रस्त ठरला आहे. या मेळाव्यात बोलताना माजी नगरसेवक उस्मान हिरौली यांनी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या. सौदी आणि दुबईला गेलेल्यांना बोलावून घ्या असे अजब आवाहन केले. विशेष म्हणजे या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मंचावर उपस्थित होते. त्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, बाहेरच्या देशातील मतदारांना आवाहन केले तर त्यात वावगे काय? याच सभेत हिरोली यांनी मृतांनाही मतदानाला बोलवा असे अजब विधान केले होते. त्यावर मात्र कोणतेही स्पष्टीकरण पवारांनी दिलेले नाही.
उस्मान हिरौली यांचे हे वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस धार्मिक ध्रुवीकरण असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाने जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचं ध्रुवीकरण करण्याचं काम सुरू आहे. ते खपवून घेणार नाही. राष्ट्रवादीकडून जातीयवादी राजकारण सुरू आहे, असा जोरदार घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यावर हल्लाबोल करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की , अशा प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ध्रुवीकरण करत असतील आणि मोदींना पराभूत करण्यासाठी मृत मुस्लिमांनाही मतदान करण्यास सांगत असेल तर हे कोणत्या लोकशाहीत बसतं? याचा निषेध होणारच आहे. ध्रुवीकरण करण्याचं काम राष्ट्रवादीचं सुरू आहे. ते खपवून घेणार नाही. राष्ट्रवादीकडून जातीयवादी राजकारण सुरू आहे अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे.
उस्मान हिरौली नेमकं काय म्हणाले
पुण्यातील कसब विधानसभा मतदार संघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अल्पसंख्यांक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक उस्मान हिरौली यांनी मुस्लिमांना मतदानासाठी आवाहन करणारं भाषण केलं. येत्या २६ तारखेला मतदान आहे. जेवढी लोकं दुबईत गेली असतील, सौदीला गेली असतील त्या सर्वांना बोलवा. सर्वांकडून मतदान करून घ्या. ज्यांचा मृत्यू झाला त्यांनाही २६ तारखेला हजर करा आणि मतदान करायला सांगा. जोपर्यंत मतदान करण्यात आघाडी घेणार नाही तोपर्यंत आपण संघ आणि मोदींना पराभूत करू शकणार नाही, असं आवाहन उस्मान हिरौली यांनी केलं. हिरौली यांच्या या अजब आणि धक्कादायक विधानानंतर पुण्यातील वातावरण तापले आहे. हिरौली यांच्या आवाहनानंतर भाजपने आता जोरदार टीका सुरु केली आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची मांदियाळी
मोदींबाबत अपशब्द वापरणारे पवन खेरा शरण आले; मागितली बिनशर्त माफी
एनआयएची मोठी कारवाई, ८ राज्यात ७६ ठिकाणी छापे
दीड लाखांची ब्रँडेड चप्पल, महागड्या जीन्स.. गुंड सुकेश चंद्रशेखरची गजाआड मजा
हा तर एकप्रकारे जिहादच..!
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून जोरदार करताना राष्ट्रवादीचा हा एक प्रकारे जिहादचा असल्याची जोरदार टीका केली आहे. . राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन पवार साहेबांच्या उपस्थितीत थेट मुस्लिमांना आवाहन केलं जातय आणि दुबई, सौदीतून मतदार आणा म्हणतात. मेलेल्यांनाही ‘जंग’साठी ‘हाजीर’ करा म्हणतात… इतकी वाईट अवस्था राज्यात राष्ट्रवादीची कधीच नव्हती…हा तर एकप्रकारे जिहादच..!, अशी तिखट प्रतिक्रिया चित्र वाघ यांनी व्यक्त केली आहे.#Modi, #Rss ला पराभूत करण्यासाठी #दुबई वरुन लोक आणा, सौदी वरून लोक आणा मेलेले आहेत त्यांना हजर करा, ही विधान आहेत @PawarSpeaks उपस्थितीत झालेल्या अल्पसंख्याक बैठकीत. कॅाग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांचे. बोगस मतदान घडविण्याची योजना पणे आखली जात आहे @ECISVEEP दखल घ्यावी, असे ट्विट भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट केले आहे. हिरोली यांचे भाषणही उपाध्ये यांनी ट्विट केले आहे.
राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन पवार साहेबांच्या उपस्थितीत थेट मुस्लिमांना आवाहन केल जातय आणि दुबई,सौदीतून मतदार आणा म्हणतात,मेलेल्यांनाही ‘जंग’साठी ‘हाजीर’ करा म्हणतात…
इतकी वाईट अवस्था राज्यात राष्ट्रवादीची कधीच नव्हती…
हा तर एकप्रकारे जिहादच..! https://t.co/1zlWYOcHzS
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 23, 2023