राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल शुक्रवार, १० जून रोजी जाहीर झाला. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र, निवडणुकीत महाविकास आघाडीला दणका देत भाजपाचे तीनही उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीचे तीन तर भाजपचे सर्व तीन उमेदवार विजयी झाले आहेत. या यशानंतर भाजपाच्या नेत्यांकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत असून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीचे कौतुक होत आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती. जय महाराष्ट्र!”
निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही,
तर जिंकण्यासाठी लढविली होती…
जय महाराष्ट्र ! #RajyaSabhaElections2022 #Maharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 10, 2022
भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनीही विजयी उमेदवारांचे अभिनंदन करणारे ट्विट केले आहे. “राज्यसभा निवडणुकीत तिसरी जागाही जिंकणार, हे आम्ही ठामपणे सांगत होतो. आवश्यक नियोजन करून आम्ही विजय मिळवला, त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीला. महाविकास आघाडीची मतं फुटली नाहीत, तर भाजपा अधिक विश्वासार्ह पर्याय वाटल्यानं ती आम्हाला मिळाली!” असं ट्विट करत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.
राज्यसभा निवडणुकीत तिसरी जागाही जिंकणार, हे आम्ही ठामपणे सांगत होतो. आवश्यक नियोजन करून आम्ही विजय मिळवला, त्याचं श्रेय @Dev_Fadnavisजींच्या रणनीतीला. मविआची मतं फुटली नाहीत, भाजपा अधिक विश्वासार्ह पर्याय वाटल्यानं ती आम्हाला मिळाली!
सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा! pic.twitter.com/yPXA4iedsG— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 11, 2022
भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “भाजपाचे अनिल बोंडे, पीयूष गोयल यांना प्राधान्याची मतं मिळाली. भाजपाचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाली. देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी झाली. अकेला देवेंद्र, जय हो!” असे अतुल भातखळकर म्हणाले आहेत. “मेंदू गुढघ्यात असतो हे सिद्ध झालं,” असा टोला अतुल भातखळकरांनी लगावला आहे.
भाजपाचे तीन ही उमेदवार विजयी. भाजपाच्या @DoctorAnilBonde
आणि @PiyushGoyal यांना पहिल्या प्रेफर्न्सची 48 मतं आणि धनंजय महाडीक यांना संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं..मा.@Dev_Fadnavis यांची रणनीती यशस्वी. मेंदू गुढग्यात असतो हे सिद्ध झाले.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 10, 2022
अकेला देवेंद्र….
जय हो @Dev_Fadnavis— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 10, 2022
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरले होते. महाविकास आघाडीचे चार उमेदवार तर भाजपाचे तीन उमेदवार शर्यतीत होते. अखेर शुक्रवार, १० जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे.
विजयी उमेदवार
- पियुष गोयल- भाजप
- अनिल बोंडे- भाजप
- धनंजय महाडिक- भाजप
- प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस
- इम्रान प्रतापगढी- काँग्रेस
- संजय राऊत- शिवसेना