उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी बोलताना लाठीचार्जसंदर्भात सरकारच्या वतीने क्षमा मागितली. तसेच या आंदोलनाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांवर शरसंधान केले.
फडणवीस म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना अनेक आंदोलने झाली पण कधी बळाचा वापर केला गेला नाही. यावेळी झालेल्या लाठीचार्जबद्दल मी क्षमायाचना करतो. मुख्यमंत्री याची चौकशी करणार आहेत. या घटनेचे राजकारण करणे मात्र योग्य नाही. फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे जालन्यात गेले. त्यांचे भाषण मी ऐकले. आरक्षणाचा अध्यादेश काढा अशी मागणी त्यांनी केली. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा का अध्यादेश काढला नाही.
लाठीचार्जचा आदेश मंत्रालयातून देण्यात आला अशा चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या गेल्या. मग गोवारी हत्याकांडावेळी कुणी आदेश दिले होते, मावळला शेतकऱ्यांवर गोळीबाराचे आदेश कुणी दिले होते. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते का, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले, शेतकरी मृत्युमुखी पडल्यावर त्यांनी राजीनामा दिला होता का, असा खरमरीत सवालही फडणवीसांनी विचारला.
फडणवीस म्हणाले की, २०१८साली आरक्षणाचा कायदा करण्यात आला. तो न्यायालयात मान्य झाला. देशात आतापर्यंत महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील आरक्षणाचा कायदा संमत झाला. पण नंतर सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली आणि आरक्षण रद्द ठरवलं गेलं.
हे ही वाचा:
सूर्याच्या सर्वात वरच्या ‘करोना’ स्तराचे तापमान २० लाख डिग्री
पंतप्रधान मोदी ऑन ड्युटी; नऊ वर्षात एकही सुट्टी नाही
आंदोलनाच्या आडून शांतता भंग करणाऱ्यांपासून सावध राहा!
‘सनातन धर्म मिटवा’ म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला महाराष्ट्रात येण्यास बंदी घाला
लाठीचार्ज कुणी केला ते सिद्ध करण्याची हिंमत आहे का?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले. लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले होते, या आरोपाबद्दल ते म्हणाले की, सातत्याने आरोप केला जात आहे की, आदेश वरून आले? पण हे आदेश कुणी दिले? असे आदेश आम्ही तिघांनी दिलेले नाहीत. जर तुमचे तसे म्हणणे असेल तर सिद्ध करून दाखवा. आहे का हिंमत!
अजित पवार म्हणाले की, काहीजण राजकीय पोळी भाजत आहेत. पण मराठआ समाजाला आवाहन आहे की, कृपया शांतता राखा, सरकार आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे. अजित पवार यांनी आपल्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आल्यासंदर्भातही टिप्पणी केली. ते म्हणाले की, शासन आपल्या दारी कार्यक्रमात आपण गैरहजर होतो कारण आपण आजारी होतो. पण याबाबत गैरसमज पसरवला गेला.