‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे असे विधान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यांच्या विधानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिले आहे. सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आज आली आहे अशी कडक टीका फडणवीस यांनी आव्हाड यांचे नाव न घेता केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये कार्यकर्त्यांबरोबर हा चित्रपट पाहिला. त्यानंतर प्रतिक्रिया देतांना फडणवीस म्हणाले , हा चित्रपट पाहिल्यावर मी एकच गोष्ट म्हणेन की, जे लोक या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भरचौकात फाशी दिली पाहिजे असं बोलले त्यांच्या सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आज आली आहे, असं मी चित्रपट पाहिल्यावर म्हणेन अशा शब्दात फडणवीस यांनी आव्हाड यांना डिवचलं.
मुलींचं शोषण करण्याचं षडयंत्र केलं जातं आहे. धर्माचा दुरुपयोग केला जातो आहे. या सगळ्या गोष्टी सत्यकथेच्या माध्यमातून बाहेर आल्या आहेत. हा चित्रपट गोष्ट सांगण्यासाठी नाही, तर जागृत करण्यासाठी आहे. यानंतर कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये म्हणून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे अशी प्रतिक्रियाही फडणवीस यांनी यावेळी दिली.
हे ही वाचा:
इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान पेटला!
ईडी म्हणते, ‘मनी लाँड्रिंग प्रकरणात परब यांची चौकशी आवश्यक’
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात ५० लाख डॉलर्सचा दंड
कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान, कर्नाटकमधील ‘हा’ समज बदलणार?
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तर थेट मौलाना असे संबोधत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मौलाना जितेंद्र आव्हाडांनी सिनेमा बंद करून दाखवावा असे आव्हानच सोमय्या यांनी दिले आहे. केरळ स्टोरी बंद करून दाखवा. हिंमत असेल तर मौलाना जितेंद्र आव्हाड, उद्धव ठाकरे शरद पवार यांनी शार पवार, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात केरला स्टोरी बंद करून दाखवावा. हिंमत असेल तर जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटाच्या प्रोड्युसरला हात लावून दाखवावा. हे हिरवं वस्त्रधारी उद्धव ठाकरे यांचे सरकार नाही किंवा सत्तेच्या खुर्चीसाठी भगवे त्याग करून हिरवे वस्त्र घातले नाही, असेही सोमय्या यांनी ठणकावत सांगितले.