राज्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढला जात आहे. हा मोर्चा आज जालना जिल्ह्यात काढला आहे. या मोर्चाला लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. या मोर्चातून फडणवीसांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं आहे. उद्धव ठाकरे हे फक्त कार चालवतात, सरकार हे इश्वर भरोसे चालले आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
जालना मध्ये जेव्हा मोर्चा सुरु होता तेव्हा तिथे पाऊस झाला. त्यावरून सुद्धा फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाण साधला. ते म्हणाले,पाणी समस्या मुख्यमंत्र्यांनी सोडवली नाही. मात्र इश्वराने लोकांची समस्या ऐकली. हा भाजपाचा मोर्चा नाही तर जालन्याचा आक्रोश आहे. भर उन्हात माता भगिनी रस्त्यावर उतरल्या आहेत. या जालन्यात आम्हाला पाणी पाहायला मिळेल का? असा सवाल फडणवीसांनी केला आहे.
पुढे फडणवीस म्हणाले, कोट्यवधींचा निधी जालन्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दिला होता. मात्र ठाकरे सरकारमध्ये सर्व काही ठप्प झाले, या ठाकरे सरकारने सर्व योजनांना स्थगिती दिली आहे. कोट्यवधी देऊन थेंबभर पाणी जालन्याच्या नळाला येत नाही? जिथे जल आक्रोश आहे तिथे तिथे भारतीय जनता पार्टी असणार आहे. जनतेच्या आक्रोशाची दखल आम्ही घेतली आहे. या ठाकरे सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय जनता शांत राहणार नाही, असे म्हणत फडणवीसांनी थेट सरकारला इशारा दिला आहे.
हे ही वाचा:
‘ शंभर पाप करून, मांजर म्याव म्याव करायला अयोध्येला’
१८ तास चौकशीनंतर राहुल गांधींची आज पुन्हा चौकशी
आयपीएल मीडिया राईट्सच्या लिलावातून बीसीसीआयने कमावले इतके रुपये
संत तुकाराम शिळामंदिर हे भक्ती आणि ज्ञानाचा आधार
गेल्या अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री तर या ठिकाणी आले नाही. तर जनतेचे प्रश्न देखील समजून घेतले नाहीत. काढलेले टेंडर देखील या सरकारने बंद पाडले. शेततळ देण्याची योजना आणली तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना आणल्या. सर्व योजनाची हत्या करण्याचे काम या सरकारने केले, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.