ईशान्य भारतातील विविध विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे या प्रांताशी भौगोलिक आणि सांस्कृतिक संबंध सुदृध होण्यास मदत होणार आहे. यामध्ये भारतातील सर्वात लांब पुल तसेच माजुली बेटाला जोडणाऱ्या पुलाचा देखील समावेश आहे. या प्रकल्पांचा कोनशिला समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे पार पडला.
नरेंद्र मोदींनी काल आसाम आणि मेघालय राज्यांना जोडणाऱ्या पुलाची कोनशिला स्थापित केली. आसामच्या धुबरी आणि मेघालयातील फुलबारी या ठिकाणांना जोडणाऱ्या या पुलाची लांबी १९ किमी असणार आहे. ईशान्य भारतातील या दोन राज्यांना जोडण्यात या पुलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
या सोबतच मोदींनी महाबाहू- ब्रम्हपुत्र या कार्यक्रमाचे देखील उद्घाटन केले आणि माजुली- जोऱ्हाट दुपरी पुलाचे भूमिपूजन देखील केले. यावेळी मोदींनी महाबाहू ब्रह्मपुत्र प्रकल्पाचे काम वेगाने चालू असल्याचे देखील सांगितले.
धुब्री- फुलबारी हा पुल चार पदरी असेल. नदीच्या उत्तर किनाऱ्यावर धुब्री या गावात तर दक्षिण तीरावर फुलबारी या गावाला जोडेल. या पुलाचा अंदाजीत खर्ज ४ हजार ९९७ कोटी असणार आहे. सध्या या दोन गावांमध्ये नदी पार करण्यासाठी ६० किमी वर असणाऱ्या पुलाचा वापर करावा लागतो. नव्या पुलामुळे या दोन गावांमधील अंतर कमी होऊन प्रवासाला लागणारा वेळ देखील वाचणार आहे.