देशात २०१४ पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे. हिंदूंची सत्ता नाही. त्यामुळे या हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून बाहेर काढा आणि हिंदूंची सत्ता आणा, असं आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर टीका केली जात आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनासुद्धा नेटकऱ्यांकडून ‘पप्पू’ या टोपण नावाची आठवण करून दिली जात आहे.
जयपूर येथे काँग्रेसने महारॅलीचं आयोजन केलं होते. या रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. या रॅलीत बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधीही यावेळी उपस्थित होत्या. जयपूरच्या विद्यानगर स्टेडियममध्ये ही रॅली सुरू होती. रॅलीच्या भोवती सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे मोठे मोठे पोस्टर लावले होते. तसेच रॅलीला हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
तुम्ही सर्वजण हिंदू आहात. हिंदुत्ववादी सत्तेचे भुकेले आहेत. २०१४ मध्ये हिंदुत्वावादी सत्तेत आले. आपल्याला या हिंदुत्ववाद्यांना हटवायचं आहे. हिंदुत्ववाद्यांना घालवून हिंदुची सत्ता यायला हवी, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
आपल्याला घाबरवलं जाऊ शकत नाही. आम्ही मृत्यूला घाबरत नाही. हिंदुत्ववाद्यांना फक्त आणि फक्त सत्ता हवी आहे. त्यांना सत्य नको आहे. त्यांचा मार्ग सत्याग्रहाचा नाही. तर सत्ता ग्रहचा आहे. हिंदू नेहमीच भयाशी संघर्ष करत असतो. ते महादेवाप्रमाणे भयाचं प्राशन करतो, असंही त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
अमेरिकेत भीषण चक्रीवादळाने घेतला १०० जणांचा बळी
शिवसेना हा नाच्यांचाच पक्ष झालेला आहे
मुंबईत १४४ ‘कलम’; एमआयएमच्या सभेला गर्दी
‘म्हाडा’ ची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींचा संताप
राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर राहुल गांधी उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा ‘जनूआधारी हिंदू’ बनण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा सवाल केला जात आहे.