देशमुख, परब ही प्यादी; खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर

देशमुख, परब ही प्यादी; खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर

ज्यांच्यावर ईडीची कारवाई झाली ते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी खरमरीत टीका केली आहे.

ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरावर छापे घातल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाकडे महाराष्ट्राचे लक्ष वळले आहे. त्यावर भातखळकर यांनी महाविकास आघाडीला चिमटा काढला आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. देशमुख यांच्याविरोधात मुंबईत रितसर तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला देशमुख यांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले. ईडीनेही त्यांच्याविरोधात अवैध आर्थिक व्यवहारांबाबत गुन्हा दाखल केला आणि त्याची चौकशी सुरू केली. त्यानंतर देशमुख यांनी ५ एप्रिलला राजीनामा दिला.

हे ही वाचा:

मुंबई-पुण्यातील प्रसिद्ध परांजपे बिल्डर्स पोलिसांच्या ताब्यात

अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीची धाड

या भेटीमागे दडलंय काय?

 …आणि आदित्यचा बनला कादिर

उद्योगपती मुकेश अंबांनी यांच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकप्रकरणी परमबीर यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटविण्यात आले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यात देशमुख हे मुंबईतील बार मालक आणि हॉटेल मालकांकडून पैसे गोळा करण्यासाठी पोलिसांना आदेश देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. अंबानी स्फोटकप्रकरणातील आरोपी आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेकडे दर महिना १०० कोटी गोळा करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. देशमुख यांनी हे आरोप फेटाळले होते.

Exit mobile version