28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणमनीलाँड्रिगचे आरोप असलेले साकेत गोखले तृणमूलचे राज्यसभा उमेदवार

मनीलाँड्रिगचे आरोप असलेले साकेत गोखले तृणमूलचे राज्यसभा उमेदवार

तृणमूलकडून एकूण सहा जणांची नावे त्यांनी जाहीर

Google News Follow

Related

तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डेरेक ओब्रायन आणि साकेत गोखले यांची नावे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने जाहीर केली आहेत. एकूण सहा जणांची नावे त्यांनी जाहीर केली असून त्यात डोला सेन, सुखेंदू शेखर रे, समिरुल इस्लाम आणि प्रकाश चिकबराइक यांचीही नावे त्यात आहेत. २४ जुलैला या निवडणुका होणार आहेत. ओब्रायन हे पुन्हा एकदा खासदारकीसाठी सज्ज आहेत तर साकेत गोखले यांना गेल्या वर्षी पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणात तुरुंगवास झाला होता. त्यानंतर ते बाहेर आले पण पुन्हा एकदा ईडीने त्यांना अटक केली होती.

तृणमूल काँग्रेसने ट्विट करत या सहा जणांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, डेरेक ओब्रायन, साकेत गोखले, डोला सेन, सुखेंदू शेखर रे, समिरुल इस्लाम आणि प्रकाश चिकबराइक यांची नावे राज्यसभेचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आम्हाला आनंद होत आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसचा विचार प्रसारित करण्याचे काम करावे आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्यरत राहावे.

डेरेक ओब्रायन, सुखेंदू, डोला यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत आता संपत असून त्यांना पुन्हा एकदा खासदारकी देण्याचा निर्णय तृणमूलने घेतला आहे. निवडणूक आयोगाने गोवा, गुजरात, पश्चिम बंगालमधील १० राज्यसभा जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या असून २४ जुलैला या निवडणुका होतील.

हे ही वाचा:

बेहिशोबी मालमत्ता जमवणारे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओमप्रकाश सोनी अटकेत

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कामासाठी पिंडवाराचे १००० कारागीर लागले कामाला

धक्कादायक! गोरेगावमध्ये रिक्षात महिलेवर अतिप्रसंग

कोविड घोटाळा प्रकरणात दंड केलेल्या कंत्राटदारालाच ३०० कोटींचं कंत्राट !

ओब्रायन हे २०११पासून खासदार आहेत. राज्यसभेतील ते तृणमूलचे नेते आहेत. सुखेंदू हे २०१२मध्ये प्रथम खासदार झाले. ते उपप्रतोद आहेत. डोला सेन २०१७मध्ये खासदार झाल्या आहेत. तर बांगला संस्कृती मंचचे अध्यक्ष समिरुल इस्लाम, बराइक व आरटीआय कार्यकर्ते तसेच पूर्वाश्रमीचे काँग्रेस कार्यकर्ते साकेत गोखले जे सध्या तृणमूलचे प्रवक्ते आहेत ही नावे खासदारकीसाठी नवीन आहेत.

तृणमूलचे बंगालमध्ये २९४ पैकी २०१६ सदस्य आहेत. त्यांना भाजपाच्या पाच सदस्यांचा पाठिंबा आहे पण ते अद्याप भाजपातून बाहेर पडलेले नाहीत. भाजपाकडे ७० आमदार आहेत. पश्चिम बंगालमधील ६, गोवा आणि गुजरातमधून ४ जागांसाठी निवडणुका होणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा