26 C
Mumbai
Saturday, November 9, 2024
घरराजकारणविधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हेंचा ठाकरेंना रामराम

विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हेंचा ठाकरेंना रामराम

निलम गोऱ्हे एकनाथ शिंदेंची भेट घेण्याची शक्यता

Google News Follow

Related

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू असून नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार हे त्यांच्या समर्थक नेत्यांना घेऊन सरकारमध्ये सामील झाले. राजकीय वर्तुळात हालचाली सुरू असतानाचं राष्ट्र्रवादीनंतर आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या विधानपरिषदेतील उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शुक्रवार, ७ जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.

ठाकरे गटाची बाजू अभ्यासू आणि खंबीरपणे मांडणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरेंना जबरदस्त दणका बसला आहे. नीलम गोऱ्हे या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहे. तसेच जेव्हा पासून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून त्या अगदी संयमाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत आहेत. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यामुळे उद्धव ठाकरेंचे मोठं नुकसान होणार आहे.

सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर अनेक नेत्यांची विशेषतः महिला नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दीपाली सय्यद, मनिषा कायंदे यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. सध्या राष्ट्रवादीला गळती लागलेली असून ठाकरे गटाला भगदाड पडणं अजूनही थांबलेलं नाही.

हे ही वाचा:

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; सहा गुन्हे दाखल

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीला जिवंत गाडले

बुलढाणा बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत होता

विधानपरिषदेत ठाकरे गटाला खिंडार  

ठाकरे गटाचे विधानपरिषदेत ११ आमदार आहेत. त्यापैकी विप्लव बाजोरिया हे एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. तर, मनीषा कायंदे यांनीही ठाकरे यांना राम राम करत एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. विधानसभेचे ४० आमदार आधीपासूनच एकनाथ शिंदेंकडे आहेत. आता विधानपरिषदेचेही तीन आमदार शिंदेंकडे गेल्यामुळे ठाकरे गटाला दणका बसणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा