32 C
Mumbai
Friday, October 18, 2024
घरक्राईमनामाठाकरे गटाचे उपनेते, माजी महापौर दत्ता दळवींना अटक; मुख्यमंत्र्यांवरचे आक्षेपार्ह विधान भोवले

ठाकरे गटाचे उपनेते, माजी महापौर दत्ता दळवींना अटक; मुख्यमंत्र्यांवरचे आक्षेपार्ह विधान भोवले

राहत्या घरातून अटक; दुपारनंतर न्यायालयात हजर करणार

Google News Follow

Related

ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली असून यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधान करणं दत्ता दळवी यांना चांगलंच भोवलं आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याने दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. दळवी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दळवी यांना दुपारनंतर न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

बुधवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलिसांनी दत्ता दळवी यांना अटक केली. दळवी यांना त्यांच्या विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. दळवी यांना भांडूप येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्रकरण काय?

रविवारी भांडूपध्ये ठाकरे गटाने कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते. राजस्थानमधील प्रचारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे ‘हिंदुह्रदयसम्राट’ अशी उपमा लावण्यात आली होती. त्यामुळे दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडूप पोलिस ठाण्यात दळवी यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. सार्वजनिक सभेत संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ आणि अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार दिली होती.

दत्ता दळवी म्हणाले होते की, “आज मिंधे गट आहे हे आपल्याला सगळ्यानां माहिती आहे. गद्दारीची कुऱ्हाड घेऊन मिंधे सरकार या ठिकाणी आरूढ झालेले आहे. पण मला वाटत आज कदाचित दिघे साहेब असते ना तर मी सांगतो या एकनाथ शिंदे ला चाबकाने फोडून काढलं असतं. एकनाथ शिंदे काय होता, एकनाथ शिंदे कुठे काय करत होता हे आम्ही स्वत: बघितलेले आहे. समजलं का? बाळसाहेबांच्या जवळ आला, बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले. उद्धवजीच्या जवळ आले, त्यांना उद्धवजींनी जवळ घेतले आणि त्यांनी एवढी मोठी गद्दारी केली. स्वतः गद्दारी केली, पक्षाशी गद्दारी केली. नाव बाळासाहेबांचेच वापरायचे.” अशा आक्षेपार्ह भाषेत आणि एकेरी उल्लेख करत त्यांनी विधान केले होते.

हे ही वाचा:

शब्द मागे घेऊन, विषय संपेल का?

बिहार सरकारने कमी केल्या हिंदू सणांच्या सुट्ट्या, मुस्लिम सणांवर सरकार मेहेरबान!

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंचा जामीन अर्ज फेटाळला

स्टॅलिन, अखिलेश यांच्या उपस्थितीत व्ही.पी. सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यामुळे आश्चर्य

दत्ता दळवी यांना अटक झाल्याची माहिती मिळताच भांडूप पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली आहे. तसेच खासदार संजय राऊत हेही हजर होते. त्यांनी दत्ता पाटील यांच्यासोबत आपण असल्याचे म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा