ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे पोलिसांच्या ताब्यात

कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी कारवाई

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे पोलिसांच्या ताब्यात

ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना पोलिसांनी ताव्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतले आहे. अद्वय हिरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

अद्वय हिरे यांनी रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ३० कोटींच्यावर ही रक्कम गेली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, अद्वय हिरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. एप्रिल महिन्यात अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यावर सुमारे ३२ कोटींची जिल्हा बँकेची थकबाकी आणि बँकेची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालेगाव शाखेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन आयेशा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचे कट्टर विरोधक मानले जातात. शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता.

हे ही वाचा:

ऐन दिवाळीत कॅनडात खलिस्तानी आणि हिंदूंमध्ये संघर्ष!

पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे केजरीवाल, प्रियांका गांधींना नोटीस

५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले

सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात

अद्वय हिरे हे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे उपनेते आहेत. त्यांनी नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्याआधी ते भाजपामध्ये होते. मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक म्हणून हिरे यांची वेगळी ओळख आहे.

Exit mobile version