25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरराजकारण‘समाजवादी पक्ष आता समाप्तवादी पक्ष झाला आहे’

‘समाजवादी पक्ष आता समाप्तवादी पक्ष झाला आहे’

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद यांचा अखिलेश यांच्यावर पलटवार

Google News Follow

Related

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली होती. या यादीवरून स्पष्टच समजून येते आहे की, त्यांनी पराभव स्वीकारला आहे. बंडखोरीच्या भीतीने अनेक विद्यमान खासदारांना तिकीट दिलेले नाही, असे ते म्हणाले होते. त्यावर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

‘सपाचे अहंकारी प्रमुख अखिलेश यादव यांच्या दाव्यात काहीच दम नाही. समाजवादी पक्ष आता समाप्तवादी पक्ष बनला आहे. सन २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष खातेही उघडू शकणार नाही,’ असा दावा त्यांनी केला.

मौर्य यांनी सपाने गेल्या चार निवडणुकांमध्ये केलेल्या दाव्यातील फोलपणा उघडकीस आणला. ‘सन २०१४मध्ये लोकसभा निवडणुकीत सपा ६० जागा जिंकेल, असा दावा त्यांनी केला होता. मात्र त्यांना अवघ्या पाच जागा जिंकता आल्या. सन २०१७मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी दावा केला की ते ३००हून अधिक जागा जिंकतील. मात्र त्यांना केवळ ४७ जागाच जिंकता आल्या. तर, सन २०१९मध्ये सपाने पंतप्रधान होण्याचा दावा केला होता. मात्र त्यांचे केवळ चारच उमेदवार जिंकून येऊ शकले. तर, २०२२मधील विधानसभा निवडणुकीत सपाने ४०० धावा जिंकण्याचा दावा केला होता,’ याची आठवण मौर्य यांनी करून दिली.

हे ही वाचा:

केजरीवाल बॅकफूटवर; आठव्या समन्सनंतर ईडीसोबत सहकार्य करण्याची तयारी

लाच प्रकरणी NHAI च्या अधिकाऱ्यासह सहा जण अटकेत

निवडणुकीत दारुण पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं ईव्हीएमवर बोट!

बहुमतानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ

मौर्य यांनी यावेळी काँग्रेसलाही लक्ष्य केले. ‘ज्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण स्वीकारले नव्हते, त्यांना जनता आगामी लोकसभा निवडणुकीतून बाद करून टाकेल,’ असा दावा करत ‘आज पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांमुळे अयोध्येचा गौरव ५० वर्षांनंतर परत आला आहे,’ असे त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा