लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान महाराष्ट्रामध्ये २० मे रोजी पार पडणार आहे.शेवटचा टप्पा असल्याने राज्यातील पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे.दरम्यान, शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका प्रचार मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकवल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता.व्हिडिओ ट्विटकरत याची माहिती नितेश राणेंनी दिली होती.याच मुद्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.मतांच्या लाचारीकरिता उद्धव ठाकरेंच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकणे हे दुर्दैव असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये आज (१५ मे) पार पडलेल्या सभेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाहीये, पंतप्रधान मोदींसमोर मतं मागता येत नाहीये, कोणी आता मतदान करायला देखील तयार नाहीत. विरोधकांच्या आता हे सर्व लक्षात आल्यानंतर भारतातील मतं संपल्यानंतर पाकिस्तानमधून मते मागण्याचा प्रयत्न सुरु आहे.पाकिस्तानचे मंत्री राहुल गांधींकरीता ट्विटकरत आहेत, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकरिता ट्विटकरत आहेत.
आम्हाला वाटले उद्धव ठाकरे आपण तरी यांच्यापेक्षा वेगळे असाल पण मला आश्चर्य वाटलं, परवा उद्धव ठाकरे यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता.काय दुर्दैव आहे बघा, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राच्या रॅलीमध्ये मतांच्या लाचारीकरिता जर पाकिस्तानचा झेंडा फडकत असेल’ तर या ठिकाणी सर्व देशभक्त पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभे राहतील आणि सांगतील, ‘मोदीजी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ आणि भारत माता की जय म्हणत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देतील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
राहुल गांधी यांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ!
‘वीर सावरकरांची निंदा करणाऱ्यांना नकली शिवसेनेकडून डोक्यावर घेऊन नाचण्याचे काम’
घाटकोपरमधील होर्डिग प्रकरण: भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात
अटल सेतूवरून जाताना ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंधाना म्हणते, भारत रुकेगा नही!
Spot on !
Master stroke ! @Dev_Fadnavis pic.twitter.com/pmA2jdeC02
— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) May 15, 2024
दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नुकताच एक उद्धव ठाकरेंच्या एका रॅलीमधील व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता.याबाबत त्यांनी पोस्ट करत लिहिले की, UBT च्या मिरवणुकित पाकिस्तान चा झेंडा ! आता काय PFI , SIMI, AL QAEDA चे लोक मातोश्रीत बिर्याणी घेऊन जातील…हे दाऊद च मुंबईत स्मारक पण बांधतील..आणि म्हणे हा मा.बाळासाहेबांचा “असली संतान”, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला होता.