महात्मा गांधींच्या अहिंसेच्या विचारांवर चालत असल्याची शेखी मिरविणाऱ्या काँग्रेसनेच या विचारांना आता मूठमाती दिली आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे.
औरंगाबाद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपसोबत जाऊन उपसभापतीपद मिळवल्यानं संतापलेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी उपसभापतीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसा आरोप उपसभापती अर्जुन शेळके यांनी केला आहे. चार दिवसांपूर्वी काँग्रेसचे नाराज पंचायत समितीचे सदस्य अर्जून शेळके यांनी भाजपशी जवळीक केली होती. त्यामुळेच त्यांना मारहाण झाल्याची घटना औरंगाबाद मध्ये घडली.
मारहाणीनंतर जखमी उपसभापती शेळके आणि त्यांचे सहकारी पवन बहुरे यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटी रुग्णालयात घडलेल्या मारहाणीची नोंद झालेली आहे. या घडलेल्या लज्जास्पद घटनेमुळे एकूणच काँग्रेसच्या वर्तणुकीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
भाजपच्या पाठिंब्यामुळे औरंगाबाद पंचायत समितीच्या उपसभापती विजयी झाल्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांना राग होता. यामध्ये काँग्रेस सदस्यांचा पराभव झाला. त्याचमुळे उपसभापती अर्जुन शेळके यांना दालनात घुसून काँग्रेसच्या काही सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याची माहिती मिळताच आमदार हरिभाऊ बागडे यांनी पंचायत समितीला भेट दिली आहे.
पराभूत उमेदवारांनी घातलेला हा गोंधळ आणि मारहाण झालेली घटना आता समोर आलेली आहे. तसेच यामध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अनुराग शिंदे यांचा एका मताने पराभव झाला. त्यामुळेच ही मारहाण करण्यात आल्याची माहिती स्वतः शेळके यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
बारावीचा निकाल ९९.६३ टक्के, पुन्हा एकदा मुलीच ठरल्या सरस
सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आता पालिकेच्या या नव्या शुल्काचा भार
ईव्हीएम विरोधकांना न्यायालयाने काय चपराक लगावली?
घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये कार्यालयात झालेली धरपकड आणि खुर्च्या भिरकावल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. काही खिडक्यांच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. औरंगाबाद पंचायत समितीत एकूण २० सदस्यांपैकी काँग्रेसचे ८, भाजप-७, सेना-३ अपक्ष-२ असे पक्षीय बलाबल आहे. गेल्या अनेक वर्षापासून पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता आहे.