निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकूण वैध मतांपैकी १/६ (सरासरी) हजार मते घेणाऱ्या पराभूत उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम परत दिली जाते. हा टप्पा पार न करणाऱ्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते. राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली असून मोठ्या संख्येने उमेदवारांनी सुरक्षा ठेव गमावली आहे. महाराष्ट्रात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ४,१३६ उमेदवारांपैकी ३,५१५ (८५%) उमेदवार निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या किमान मतांची टक्केवारी मिळवण्यात अयशस्वी झाल्यामुळे त्यांनी त्यांची सुरक्षा ठेव गमावली. एकूण ३.५ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. ही रक्कम १० वर्षातील सर्वाधिक आहे.
२०१४ मध्ये, ४,११९ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती त्यातील ३,४२२ (८३.१%) उमेदवरांनी अनामत रक्कम गमावली, ज्याची रक्कम ३.४ कोटी रुपये होती. २०१९ मध्ये ३,२३७ पैकी ८०.५% उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्याची एकूण किंमत २.६ कोटी रुपये इतकी होती. लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ अन्वये, एखादा उमेदवार त्यांच्या मतदारसंघातील एकूण वैध मतांपैकी किमान एक षष्ठांश मत मिळवू शकला नाही, तर सुरक्षा ठेव जप्त केली जाते.
प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या उमेदवाराला १० हजार रुपये डिपॉझिट भरावे लागते, तर SC आणि ST उमेदवारांना पाच हजार रुपये भरावे लागतील. दोन प्रमुख युतींपैकी महाविकास आघाडीला सुरक्षा ठेवींमध्ये सर्वात जास्त नुकसान सोसावे लागले. २२ जागांवर त्यांच्या उमेदवारांनी पैसे गमावले. नऊ जागांवर एकट्या काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यापाठोपाठ ठाकरे गट आठ आणि राष्ट्रवादी पवार गट तीन जागांवर आहेत. शेतकरी आणि कामगार पक्षाला एका जागेवर अनामत गमावली लागली.
दुसरीकडे, राज्यभरात भाजपच्या एकाही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले नाही. तथापि, विदर्भातील दर्यापूर (अमरावती जिल्हा) येथे शिवसेनेच्या उमेदवाराचे डिपॉझिट गमवावे लागले आणि महाराष्ट्रातील पाच जागांवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे डिपॉझिट गमवावे लागले. त्याच जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या अनामत रकमा गेल्याची अनोखी परिस्थिती पाहायला मिळाली.
चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेश यावलकर यांना ९९,६८३ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे देवेंद्र भुयार आणि राष्ट्रवादीचे (एसपी) गिरीश कराळे यांना अनुक्रमे ३४,६९५ आणि ३१,८४३ मते मिळाली जी अनिवार्य संख्येपेक्षा कमी होती. इतर लहान पक्षांनाही ठेवी जप्तीचा सामना करावा लागला. वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बहुजन समाज पार्टी यांना राज्यभरातील जवळपास सर्व जागांवर अनामत रक्कम गमावली. माहीम मतदारसंघात मात्र पराभूत झालेले मनसेचे अमित ठाकरे हे अपवाद ठरले.
हेही वाचा..
बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीत चर्चा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवाना!
ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान दिलं तर २ आमदार शिल्लक राहतील उर्वरित इकडे येतील!
जलेबी-फाफडा विरुद्ध उद्धव ठाकरे बापडा
नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले आणि डिपॉझिट गमावलेले अपक्ष सचिन वाघाडे म्हणाले, लढणं हा आमचा घटनात्मक अधिकार आहे आणि आम्ही त्यात सहभागी होतो कारण आमचा अजूनही लोकशाहीवर आणि लोकशाहीच्या प्रक्रियेवर विश्वास आहे. निष्पक्षता सुनिश्चित करा आणि बोगस उमेदवारांना प्रतिबंध करा. संपूर्ण अनामत जप्त करण्याऐवजी २५% रक्कम राखून ठेवली पाहिजे.