कर्नाटक राज्यात उद्भवलेला हिजाब वाद आता कुठेतरी थांबलेला असतानाच आता हलाल वरून नवा वादंग होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कर्नाटकमध्ये हा लाल मांसवर बंदी घालावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देखील सरकार या विषयात संपूर्ण अभ्यास करून यात लक्ष घालेल असे म्हटले आहे
कर्नाटक मधील काही हिंदुत्ववादी संघटनांनी हलाल मांस विकत घेऊ नये अशा प्रकारचे आवाहन राज्यातील हिंदू धर्मीयांना केले आहे. सध्या याच मुद्द्यावरून कर्नाटक मधील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. हलाल मांस हा इस्लाम धर्मानुसार पवित्र समजला जातो. पण त्यासाठी प्राण्यांना अतिशय क्रूर पद्धतीने मारण्यात येते.
हे ही वाचा:
‘गरीब नवाज चाहे तो हिंदुस्तान का पता ना चले’…कव्वाली गायक नवाज शरीफची मुक्ताफळे! गुन्हा दाखल
‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’
आसाम, मणिपूर, नागालँडमधील AFSPA क्षेत्र कमी करण्याचा निर्णय
पाच तासांच्या तपासानंतर सतीश उकेंना ईडीने घेतलं ताब्यात
या संदर्भात मत व्यक्त करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “हा विषय नुकताच सुरू झाला आहे. आम्ही या संपूर्ण विषयाचा सखोल अभ्यास करू. याचा नियमावली किंवा तत्सम गोष्टींची कोणताही संबंध नाही. फक्त चालू असलेली ही प्रथा आहे. याबद्दल काही गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. आम्ही त्याबद्दल नक्की लक्ष घालू” असे बोम्मई यांनी म्हटले आहे.
त्यामुळे आता येणाऱ्या काळात कर्नाटक सरकार हलाल मांसाच्या संदर्भातील काही निर्णय घेते का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. कर्नाटकमध्ये सध्या या विषयांची सर्वत्र चर्चा असून या बादल अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत.