गोरगरिबांसाठी केलेली मागणीही महाविकास आघाडीने फेटाळली

गोरगरिबांसाठी केलेली मागणीही महाविकास आघाडीने फेटाळली

सध्या संपूर्ण जगासमोर कोविडचे संकट उभे आहे. यामुळे गरीबांचे अतोनात नुकसान होत आहे. अशा वेळेस गरीबांना सहाय्य मिळावे यासाठी आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारकडे गरीबांना एक वर्षासाठी मोफत अन्न मिळावे अशी मागणी केली होती.

भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या धर्तीवर केशरी शिधापत्रिका धारकांना कोरोना काळात एक वर्षासाठी मोफत धान्य द्यावे अशी मागणी सरकारकडे केली होती. मात्र ठाकरे सरकारकडून ही मागणी फेटाळण्यात आली आहे.

कोरोनामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली असल्यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुद्धा स्वतः धान्य विकत घेऊन केशरी शिधापत्रिका धारकांना एका वर्षांपर्यंतचे गहू-तांदूळ मोफत किंवा माफक दरात देण्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नकार दिला आहे. राज्यातील गरीब जनतेच्या हालअपेष्टांशी काहीही देणंघेणं नसलेल्या व केवळ वसुलीत स्वारस्य मानणाऱ्या महाविकास आघाडी सरकारची गरीबविरोधी मानसिकता यातून पुन्हा एकदा सिद्ध झाली असल्याची टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

याबद्दल अतुल भातखळकर यांनी ट्वीट देखील केले आहे. या ट्वीटमध्ये ही मागणी फेटाळले जाणे अपेक्षेप्रमाणे घडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्वीटमध्ये ते म्हणतात

कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या केसरी शिधापत्रिकाधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनेही धान्य विकत घेऊन त्यांचे मोफत अथवा माफक दरात वाटप करावे ही माझी मागणी अपेक्षेप्रमाणे गोरगरिबांची कुठलेही नाते नसलेल्या विकास आघाडी सरकारने फेटाळून लावली आहे.

हे ही वाचा:

मनसेचे अर्धनग्न आंदोलन

मिश्र लसीच्या चाचणीला डीसीजीआयची परवानगी

अनुपस्थित खासदारांचा मोदी घेणार तास?

औरंगाबादमधील उद्योगांवर ‘गुंडां’तर

अतुल भातखळकर यांनी विधानसभेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या वेळी एका बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार १० ऑगस्ट रोजी घेतल्या गेलेल्या बैठकीत आमदार अतुल भातखळकर यांनी वरील मागणी केली होती. त्याबरोबरच त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांसाठी मोफत अन्न पुरवठा केला असल्याचा दाखला देत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत धान्यवाटपाची मागणी केली होती. त्याबरोबरच राज्य स्वस्त धान्य दुकानातून भेसळयुक्त धान्य वाटप केले जात असल्याची बाब देखील मंत्री छगन भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांकडून देखील मिळाले. याबाबतीत अतुल भातखळकर यांनी ट्वीट देखील केले आहे. त्यामध्ये त्यांनी या संदर्भातील सविस्तर पत्रक देखील जोडले आहे.

 

Exit mobile version