राहुल गांधींना दिल्ली पोलिसांची नोटीस; काश्मीरमधील महिलांबद्दल केले होते विधान

महिलांनी आपल्यावर बलात्कार आणि विनयभंग झाल्याची तक्रार केल्याचा राहुल गांधी यांचा दावा

राहुल गांधींना दिल्ली पोलिसांची नोटीस; काश्मीरमधील महिलांबद्दल केले होते विधान

भारत जोडो यात्रेदरम्यान काश्मीरमधील महिलांनी बलात्कार आणि विनयभंग झाल्याच्या तक्रारी केल्याचे विधान काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी केले होते. त्यासंदर्भात आता दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना नोटीस पाठवली असून कोणत्या महिलांनी ही माहिती दिली होती, ते सांगावे म्हणजे त्यासंदर्भात कारवाई करता येईल, असे म्हटले आहे.

भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये आली तेव्हा राहुल गांधी यांनी तिथे केलेल्या भाषणात दावा केला होता की, जेव्हा मी काश्मीरमध्ये चालत होतो. तेव्हा अनेक महिला रडत होत्या. अनेक महिला भावनिक होत्या. त्या महिलांमध्ये अशाही महिला होत्या ज्यांनी सांगितले की त्यांच्यावर बलात्कार झाला आहे. त्यांचा विनयभंग केला आहे, मी त्यांना म्हणालो की, मी हे पोलिसांनी सांगू का तर त्या म्हणाल्या की, आम्ही केवळ आपल्याला म्हणून सांगतो आहोत. कारण पोलिसांना सांगितले तर आमचे आणखी नुकसान होईल. ही सध्याची स्थिती आहे. अशा अनेक कहाण्या मी सांगू शकतो. राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात दिलेल्या भाषणातही काश्मीरमधील महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यात ते म्हणाले होते की, आपल्याला दोन महिलांनी संपर्क साधला. आपला हात धरून त्यातील एक महिला म्हणाली की, माझी बहीण आणि माझ्यावर पाच जणांनी सामुहिक बलात्कार केला. राहुल गांधी म्हणाले की, आपला भाऊ राहुल गांधी यांना हे माहीत व्हावे एवढीच त्या महिलांची इच्छा होती.

हे ही वाचा:

ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन

अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…

तालिबानी घेणार भारताकडून ऑन लाईन प्रशिक्षण

भारताच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल मिळणार का?

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून दिल्ली पोलिसांनी त्यांना काही प्रश्न पाठवले आहेत. त्यात या महिलांची माहिती आपल्याला देण्यात यावी जेणेकरून त्यांच्यावर जे अत्याचार झाले आहेत त्याची माहिती घेता येईल. त्या महिलांना सुरक्षा पुरवता येईल आणि गुन्हेगारांविरोधात कारवाई करता येईल.

 

Exit mobile version