आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण झाल्याचे कथित प्रकरण समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए विभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशातच आता दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए विभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांचे पथक शनिवार, १८ मे रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. तेथून पोलिसांनी बिभव कुमारला ताब्यात घेतले आले. स्वाती मालीवाल यांनी आरोप केला की, जेव्हा त्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी गेल्या होत्या तेव्हा बिभवने त्यांना मारहाण केली. पोलीस आता बिभवला रुग्णालयात नेणार असून काही वेळात त्याला अटक होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांना बिभव दिल्लीबाहेर नसून केवळ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती.
दरम्यान, केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांच्याविरोधात काउंटर केस दाखल केली होती. बिभवने स्वाती मालीवाल यांच्यावर आरोप केले आहेत. त्याने ईमेलद्वारे दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. यामध्ये बिभवने स्वत:ला निर्दोष घोषित करत स्वाती मालीवाल यांचा हेतू अरविंद केजरीवाल यांना हानी पोहोचवण्याचा असल्याचे म्हटले आहे. अशातच, दिल्ली पोलिसांना त्याच्या तक्रारीसंदर्भात पाठवलेल्या मेलचा आयपी ॲड्रेसही पोलिसांनी ट्रॅक केला होता. अनेक टीम सतत बिभवचा शोध घेत होती आणि अखेर विभवला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आलं.
हे ही वाचा:
आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा मुंबई गुणतक्त्यात तळाला
केजरीवाल यांनी न्यायालयात आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध करावे
कन्हैया कुमार यांना हार घालण्याच्या बहाण्याने मारहाण
मुंबईकरांनो रेकॉर्डब्रेक मतदान करा…देशात सगळे जुने विक्रम तुटणार आहेत
१३ मे रोजी स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. यानंतर त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय बिभव कुमारवर गंभीर आरोप केले होते. यानंतर त्यांनी एफआयआर दाखल करून शुक्रवारी न्यायालयासमोर आपला जबाब नोंदवला. ज्यामध्ये बिभववर गंभीर आरोप करण्यात आले होते.