दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला आहे. जैन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यामुळे सत्येंद्र जैन यांना न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात राहावे लागणार आहे.
सत्येंद्र जैन यांना जामीन देणे हा खटल्याचा योग्य टप्पा नाही. मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाचा तपास सुरू आहे. ईडीचे छापे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जैन सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.जैन यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे असलेले सर्व खाते दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देण्यात आली आहेत. ईडीने ३० मे सत्येंद्र जैन यांना मनी लाँडरिंग प्रकरणी अटक केली. ईडीने यापूर्वी जैन आणि त्यांच्या नियंत्रणाखालील कंपन्यांची ४.८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
हे ही वाचा:
दाऊदच्या गँगकडून साध्वी ठाकूर यांना धमकीचा फोन
‘अग्निपथ योजने’संबंधी गृहमंत्रालयाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
काश्मीरमध्ये पोलिस निरीक्षकाची गोळ्या घालून हत्या
१०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट
याआधी, न्यायालयाने सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावरील निर्णय मंगळवार, १८ जूनपर्यंत राखून ठेवला होता. जैन यांना ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींखाली एका प्रकरणात अटक केली होती.