दिल्लीतील लॉकडाऊन एका आठवड्याने वाढला

दिल्लीतील लॉकडाऊन एका आठवड्याने वाढला

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणखी एक आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

देशातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नवी दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राज्य सरकारने एक आठवड्यांचा लॉकडाऊन लागू केला होता. मात्र तरीही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हा लॉकडाऊन एक आठवड्यांसाठी वाढवला आहे. यानुसार येत्या ३ मे पर्यंत नवी दिल्लीत लॉकडाऊन असणार आहे.

नवी दिल्लीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सोमवारी ३ एप्रिल सकाळी ५ पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार आहे. लॉकडाऊनदरम्यान कोरोना रुग्णवाढीचा वेग ३६-३७ टक्के इतका झाला आहे. दिल्लीत यापूर्वी कोरोना रुग्णवाढीचा वेग इतका नव्हता. गेल्या एक दोन दिवसापूर्वी हा वेग थोडा कमी झाला आहे. आजही कोरोना रुग्णवाढीचा वेग ३० टक्के झाला आहे, अशी माहिती नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

हे ही वाचा:

आंध्र, कर्नाटकने ऑक्सिजन उचलला, ठाकरे सरकारची फक्त तोंडपाटीलकी

३६.३० टक्के मुंबईकरांमध्ये कोरोना रोगप्रतिकारशक्ती- सेरो सर्वे

कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोविशील्डनंतर कोवॅक्सीनचीही किंमत जाहीर

दिल्ली सद्यस्थितीत ७०० टन ऑक्सिजनची गरज आहे. आम्हाला केंद्र सरकारकडून ४८० टन ऑक्सिजन देण्यात आले आहे. उद्या केंद्र सरकार १० टन ऑक्सिजन पाठवणार आहे. त्यानंतर केंद्राकडून नवी दिल्लीला ४९० टन ऑक्सिजन मिळणार आहे. मात्र अद्याप यातील केवळ ३३०-३३५ टन ऑक्सिजन दिल्लीत पोहोचला आहे. केंद्र सरकारकडून खूप पाठिंबा मिळत आहे. केंद्र आणि दिल्ली सरकार एकत्र काम करत आहेत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

Exit mobile version