दिल्ली हे देखील भारातातील कोरोनाचा कहर झालेल्या राज्यांपैकी एक राज्य झाले आहे. या राज्यात देखील दिवसागणीक हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या नायाब राज्यपाल अनिल बैजल यांनी रुग्णालयांतील खाटांची अवस्था कळण्यासाठी हेल्पलाईन चालू करण्याचे आदेश दिले आहेत.
नायाब राज्यपालांनी या सुचना त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत या सुचना केल्या आहेत. राज्यपालांनी दिल्लीतल्या अनेक उच्चस्तरिय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी नायाब राज्यपालांनी काही सूचना देखील केल्या.
हे ही वाचा:
जिलेटिनची कांडी आणि ऑक्सिजनची नळकांडी
बीडमध्ये कोरोनाचा हाहाकार, सत्ताधारी मात्र गायब
उत्तर प्रदेशातही दर रविवारी टाळेबंदी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रडत लक्ष्मी
नायाब राज्यपालांनी गर्दीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या. त्याबरोबरच गर्दीच्या वेळी तिथे अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याच्या सुचना देखील दिल्या.
यावेळी नायाब राज्यपालांनी याच बैठकीत अशीही सुचना केली की, रुग्णांना रुग्णालयातील बेड्सची माहिती मिळावी यासाठी हेल्पलाईन चालू करण्यात यावी. त्याचबरोबर ही माहिती सरकारी पोर्टल्सवर देखील उपलब्ध करून द्यावी. रुग्णालयात रुग्णांना सहाय्य करण्यासाठी एका हेल्पडेस्कची स्थापना करण्याची सूचना देखील नायाब राज्यपालांनी केली. सर्व विभागांकडून सुसूत्रीत कार्यवाहीची गरज या महामारीला रोखण्यासाठी आवश्यक असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दिल्लीत सध्या मोबाईल ऍपद्वारे ही माहिती दिली जात आहे. त्याबरोबरच या मोबाईल वरील ऍप आकडे योग्य नसल्याची तक्रार देखील केली जात आहे. दिल्लीतही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.